आडमुठी भुमिका घेणं योग्य नाही, उत्पल पर्रीकरांना फडणवीसांच्या कानपिचक्या

जुने जाणते निरपेक्ष भावनेने काम करतायत
Devendra Fadnavis and  Utpal Parrikar
Devendra Fadnavis and Utpal Parrikar Dainik Gomantak

स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी स्वत:च्या पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपला राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपला राजकीय अजेंडा जाहीर करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यात त्यांनी विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) अपक्ष लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे गोव्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Devendra Fadnavis and  Utpal Parrikar
उत्पल पर्रीकरांसाठी शिवसेना पणजीतून माघार घेणार?

दरम्यान, त्यांच्या या निर्णयावर भाजपकडून (BJP) प्रतिक्रिया देताना नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना फटकारल आहे. ते म्हणाले की स्व. मनोहर पर्रिकर संघटन शरण होते. संघटनेनी सांगितलं ते करायचं ही त्यांची पद्धत होती. माझी अपेक्षा आहे हीच पद्धत उत्पलची असली पाहीजे. पक्ष चांगला विचार करतोय तर आडमुठी भुमिका घेणं योग्य नाही. पुढे बोलताना ते म्हणाले की जुने जाणते कोणी नाराज नाही. जुने जाणते निरपेक्ष भावनेने काम करतायत त्यावर हा पक्ष उभा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com