लेट नाईट ऑपरेशन! कोलवा येथे मसाज पार्लरमधून नऊ मुलींची सुटका; पोलिस, अर्ज यांची संयुक्त कारवाई

Goa Police Operation: मानवी तस्करी विरोधी पथक, कोलवा आणि अर्ज या सामाजिक संस्था यांनी संयुक्त पद्धतीने ही कारवाई केली.
Human trafficking rescue Goa
Colva massage parlour raidDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दक्षिण गोव्यात मसाज पार्लरमधून नऊ मुलींची सुटका करण्यात आली आहे. मानवी तस्करी विरोधी पथक, कोलवा पोलिस आणि अर्ज या सामाजिक संस्था यांनी संयुक्त पद्धतीने मंगळवारी (०७ ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास ही कारवाई केली.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. दक्षिणेतील मानवी तस्करीच्या घटना रोखण्यासाठी आणि अवैध कामांमध्ये अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी पोलिस नेहमी प्रयत्नशील असतात. याच अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मानवी तस्करी विरोधी पथक, कोलवा आणि अर्ज या सामाजिक संस्था यांनी संयुक्त पद्धतीने ही कारवाई केली.

Human trafficking rescue Goa
गोव्यात घुमल्या पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणा; पणजी चर्च समोर इस्त्राईल विरोधात निदर्शने करणाऱ्यांना पोलिसानी घेतले ताब्यात

अर्ज सामाजिक संस्था आणि दक्षिण गोव्याचे पोलिस या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे याचा तपास घेत आहेत. या कारवाईत सुटका केलेल्या मुलींच्या आवश्यक सुरक्षा आणि संरक्षणासाठी पोलिसांकडून मदत केली जात आहे.

दरम्यान, ऑगस्टमध्ये फोंडा येथे देखील केलेल्या कारवाईत एक तरुणीची सुटका करण्यात आली होती. यावेळी तिघांना अटकही करण्यात आली होती.

Human trafficking rescue Goa
Goa Congress: अमित पाटकरांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष? दिल्लीत गोव्यातील सर्व काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक

राज्यात मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने मसाज पार्लर सुरु असल्याचा आरोप करण्यात येतो. या मसाज पार्लरमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी सुरु असल्याचाही दावा केला जातो. याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी करुन, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जातेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com