Goa Zuari Bridge: झुआरी पुलाचा शेवटचा भाग आज जोडला जाणार

नोव्हेंबरपर्यंत झुआरी पूल तयार होईल
Zuari Bridge
Zuari Bridge Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांच्या उपस्थितीत आज बांधकामाधीन झुआरी पुलाचा शेवटचा भाग उचलण्यात आला. 3 पॅकेजेसमध्ये तडजोड करून पूल आणि कनेक्टिंग रस्ते पायाभूत सुविधांवर 1,436 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या वर्षी नोव्हेंबरपर्यंत हा पूल सार्वजनिक वापरासाठी तयार होण्याची शक्यता आहे.

(Last segment of Zuari bridge to be connected today. Bridge to be ready by November)

Zuari Bridge
Goa Sopo: सोपो वाढविण्यास विक्रेत्यांचा विरोध

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, सरकारने केवळ गोव्यातील रस्ते पायाभूत सुविधांवर 22,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. या पुलाची देखभाल दुरुस्तीचा एक भाग म्हणून दिलीप बिल्डकॉन 8 वर्षांसाठी पाहणार आहेत. पुलाच्यावर फिरणारे टॉवर हे पुलाच्या पायाभूत सुविधांचा भाग नाहीत, परंतु सरकार लवकरच PPP मोडमध्ये टॉवरच्या कामाची निविदा काढेल, असे PWD मंत्री नीलेश यांनी सांगितले.

झुआरी पूलाच्या केबल स्टेडचे काम अंतिम टप्प्यात

उत्तर व दक्षिणेला जोडणारा झुआरी नदीवरील बहुप्रतिक्षेत असलेला नव्या केबल स्टेड पुलाची बारकाईने पाहणी चीनच्या पथकाने केली होती. यात ओव्हीएम मशिनरी कंपनी लि.चे उपसरव्यवस्थापक वेई झेजून तसेच ली शाँगग्राँग या दोघांचा समावेश होता. त्यानंतर आज मंगळवारी येत्या नोव्हेंबरपर्यंत त्याचा एक मार्ग सुरू करण्यास कोणतीच अडचण नसल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे सरकारने सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.

Zuari Bridge
Goa Update|गोव्यात कमी दर्जाचे लोहखनिज आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही; मुख्यमंत्री

अत्याधुनिक गॅलरी

आशिया खंडातील हा अनोखा पूल असून, या पुलाच्या अंतिम टोकावर हॉटेल आणि व्हिविंग गॅलरी उभारण्यात येणार आहे. यासाठीही चीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या मनोऱ्याच्या गॅलरीत जाण्यासाठी पाण्यातून लिफ्टची सोय केली जाणार असून त्यासाठी बोटींची सोय केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यासाही हे नवे पर्यटन स्थळ बनण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे विलंब

दुलिप बिल्डकॉन कंपनीतर्फे बांधण्यात येत असलेल्या झुआरी पुलाचे मुख्य सल्लागार हे चीनचे अधिकारी आहेत. शिवाय या पुलासाठी लागणारे केबल स्डेट यासह इतर सामानही चीनच्या तंत्रज्ञानाचे आहे. २०१९ च्या शेवटी चीनमधून कोरोनाचा उद्रेक झाला त्यामुळे चिनी प्रवासी आणि नागरिकांवर विविध देशांनी प्रवासासाठी निर्बंध घातले होते त्यामध्ये भारताचाही समावेश होता. त्यामुळे हे अधिकारी भारतात येऊ शकले नव्हते. या कारणास्तव पुलाचे बांधकाम रेंगाळले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com