'पर्यटन क्षेत्रात गोवा सरकार अतुलनीय काम करतयं': पीयूष गोयल

जेवढ्या जास्त प्रमाणात पर्यटन क्षेत्रामध्ये प्रगती होईल तेवढ्या प्रमाणात गोव्यातील (Goa) जनतेच्या हाताला काम मिळेल.
Piyush Goyal

Piyush Goyal

Dainik Gomantak 

Published on
Updated on

देशात आगामी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात गोवा राज्याचाही समावेश आहे. गोवा विधानसभा निवडणुकाच्या पाश्वभूमीवर सत्ताधारी भाजपला पराजित करण्यासाठी कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्डने युती करत आपली ताकद दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. यातच मागील काही दिवसांपूर्वीच तृणमुल कॉंग्रेसने महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाशी युती करत भाजपला टक्कर देण्यासाठी आपली सज्जता दाखवली. यातच अनेक राष्ट्रीय नेते गोव्यात येऊन विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवत आहेत. आता भाजपचे वरिष्ठ नेते आणि मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) गोव्यात आले आहेत.

<div class="paragraphs"><p>Piyush Goyal</p></div>
गोव्यातील खाणींच्या लिलावाला कधी सुरुवात होणार ?

पीयूष गोयल (Piyush Goyal) म्हणाले, ''सावंत सरकार राज्यातील तरुणांना नोकऱ्या देत आहे. पर्यटन क्षेत्रामध्येही सावंत सरकार अतुलनीय काम करत आहे. पर्यटनामध्ये मागील आठ ते दहा वर्षाचा लेखाजोखा घेतला तर 25 ते 26 लाख पर्यटक गोव्याला (Goa) भेट दिली. तर 2019 मध्ये कोरोनाचं संकट येण्यापूर्वी 80 लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. जेवढ्या जास्त प्रमाणात पर्यटन (Tourism) क्षेत्रामध्ये प्रगती होईल तेवढ्या प्रमाणात गोव्यातील जनतेच्या हाताला काम मिळेल. गोव्यातील अर्थव्यवस्थेला गती मिळेल. नागरिकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा होईल. गोवा अधिक गतीमानतेने आर्थिक प्रगती करु लागला आहे. मी मागील 25 वर्षापासून गोव्याला भेट देत आहे. गोवा माझे आवडते डेस्टीनेशन प्लेस आहे. गोव्याला ओरिएंट ऑफ इस्टही म्हटले जाते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गोवा मला आकर्षित करतो.''

गोयल पुढे म्हणाले, 'मायनिंगसंबधी एक पारदर्शी व्यवस्था केंद्र सरकारने (central government) सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार बनवली होती. या प्रणालीनुसार गोव्यातही काम व्हावे यासाठी राज्य सरकार काम करत आहे. त्याचबरोबर राज्यातील वाढते प्रदूषण रोखण्याबरोबर मायनिंग व्यवस्थेसंबंधी समतोल साधण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करत आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com