Lantern Festival Ban : लँटर्न फेस्टिव्हलला मनाई : पर्यटन संचालक

Lantern Festival Ban : मोरजी किनारा कासव संवर्धनासाठी अधिसूचित केला आहे. त्यामुळे या फेस्टिव्हलला वन खात्याने यापूर्वीच आक्षेप घेतला आहे.
Lantern Festival Ban
Lantern Festival BanDainik Gomantak

Lantern Festival Ban :

पणजी, पर्यावरणाला मारक ठरणाऱ्या कोणत्याही फेस्टिव्हलसाठी परवानगी दिली जाणार नाही. मोरजी समुद्रकिनारी २५ मे रोजी आयोजित केलेल्या एकदिवसीय लँटर्न फेस्टिव्हलसाठी आयोजकांना पर्यटन खात्याने परवानगी दिलेली नाही.

या फेस्टिव्हलच्या ठिकाणी जाऊन पर्यटन खात्याचे अधिकारी तपासणी करतील. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पर्यटन संचालक सुनील अंचिपका यांनी दिली.

पर्यटन खाते शाश्‍वत पर्यटनाला प्रोत्साहन देते. लँटर्न फेस्टिव्हलसंदर्भातील माहिती वृत्तपत्रातून मला समजली. या फेस्टिव्हलसाठी पर्यटन खात्याची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे हा फेस्टिव्हल मोरजीत होऊ शकत नाही. पर्यावरणाला मारक असेल तर त्याला परवानगी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Lantern Festival Ban
Water Sports In Goa: जलक्रीडा ऑपरेटर्सचे होणार लवकरच ऑडिट, किनारपट्टी भागात पर्यटन खात्याकडून सुरक्षा उपाययोजना

आयोजकांकडून या फेस्टिव्हलची जाहिरात केली जात असून त्यामध्ये स्काय लँटर्न, म्युझिक अँड डान्स तसेच फेस पेंटींग यासारखे कार्यक्रम आहेत. त्याची तिकिट विक्रीही सुरू झाली आहे. त्यामुळे वन आणि पर्यटन खाते याविरुद्ध कोणती कारवाई करणार, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

वन खात्याचाही आक्षेप

मोरजी किनारा कासव संवर्धनासाठी अधिसूचित केला आहे. त्यामुळे या फेस्टिव्हलला वन खात्याने यापूर्वीच आक्षेप घेतला आहे. तेथील संपूर्ण क्षेत्र ऑलिव्ह रिडले कासवांसाठी घरटे बनविण्यासाठीचे ठिकाण म्हणून निवडले आहे. हा फेस्टिव्हल आयोजित केल्यास गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन ठरू शकते. त्यामुळे वन खात्याने यासंदर्भात सरकारला माहिती दिली आहे.

महोत्सवस्थळी पोलिस तैनात

पेडणेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी मांद्रे पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांना पत्र पाठवून शुक्रवार, ता. २५ मे रोजी मोरजी समुद्रकिनारी आयोजित केलेला ‘ग्लोफेस्ट लँटर्न फेस्टिव्हल’ होणार नाही, याची खात्री करण्यासाठी आवश्यक पोलिस दल तैनात करण्यास आणि काटेकोर दक्षता घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे हा फेस्टिव्हल साजरा करण्याचा प्रयत्न झाल्यास कारवाईची टांगती तलवार अटळ आहे.

Lantern Festival Ban
FC Goa Brandon Fernandes: ब्रँडन फर्नांडिसची ‘एफसी गोवा’ला सोडचिठ्ठी

मनोरंजनाचा खजिना :

या फेस्टिव्हलमधून पर्यटक व बिगर गोमंतकीयांना स्थानिक व्यावसायिकांशी समन्वय साधणे शक्य होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये २४ मे रोजी पारंपरिक फॅशन शो, सांस्कृतिक नृत्य आणि मॅजिक शो होईल. २५ मे रोजी हेमा सरदेसाई यांचे गायन तसेच लिन्स टायडल व्हेव कार्यक्रम होईल. २६ रोजी ‘२४ के इंडिया’, ट्रुली युवर्स व आर्चिस यांचे कार्यक्रम होतील. शिवाय पारंपरिक नृत्य, मिमिक्री, कॉमेडी नाट्य, फिल्म्स, बुक स्टॉल्स, फोटो गॅलरी यांचा समावेश असेल.

साळगावात आजपासून तीन दिवस ‘गोवा हेरिटेज फेस्टिव्हल’चे आयोजन

गोव्यातील पारंपरिक लोकनृत्ये तसेच खाद्यपदार्थ जागतिक पातळीवर नेण्यासाठी साळगाव येथील फुटबॉल मैदानावर २४ ते २६ मे असे तीन दिवस गोवा हेरिटेज फेस्टिव्हल आयोजित केला आहे. स्थानिक कलाकार व संगीतकारांना कला प्रदर्शित करण्यासाठी हे व्यासपीठ आहे. गोव्यातील हेरिटेज खजिन्याचे प्रदर्शन येथे मांडण्यात येईल.

हस्तकला व अन्नपदार्थांचे स्टॉल्स असतील. स्वयंसाहाय्य गट वगळून इतर स्टॉल्सना शुल्क आकारण्यात येईल. सुमारे ५० स्टॉल्सची व्यवस्था केली आहे, असे पर्यटन सचिव सुनील अंचिपका यांनी सांगितले. यावेळी पर्यटन खात्याचे उपसरव्यवस्थापक दीपक नार्वेकर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com