FC Goa Brandon Fernandes: ब्रँडन फर्नांडिसची ‘एफसी गोवा’ला सोडचिठ्ठी

FC Goa Brandon Fernandes: पूर्वाश्रमीच्या संघात ः आगामी फुटबॉल मोसमासाठी मुंबई सिटी संघाला प्राधान्य
Brandon Fernandes | FC Goa
Brandon Fernandes | FC GoaDainik Gomantak

Brandon Fernandes

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तब्बल सात वर्षे प्रतिनिधित्व केल्यानंतर आंतरराष्ट्रीय गोमंतकीय मध्यरक्षक ब्रँडन फर्नांडिस याने आता एफसी गोवाला सोडचिठ्ठी देण्याचे पक्के केले. त्यावर अधिकृतपणे लवकरच शिक्कामोर्तब होईल. त्याने पूर्वाश्रमीचा संघ आयएसएल करंडक विजेत्या मुंबई सिटी एफसीला प्राधान्य दिले आहे.

आयएसएल स्पर्धेत २९ वर्षीय ब्रँडन २०१७-१८ ते २०२३-२४ पर्यंत एफसी गोवातर्फे खेळला. यावेळच्या आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. ब्रँडनच्या नेतृत्वाखाली एफसी गोवाला उपांत्य फेरीतील दोन टप्प्यात मुंबई सिटी एफसीने ५-२ गोलसरासरीने (३-२ व २-०) हरविले. ब्रँडनने यंदा आयएसएल स्पर्धेत तीन गोल नोंदविले.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई सिटीने ब्रँडनशी दीर्घकालीन (किमान चार वर्षे) करार केला आहे. ‘एफसी गोवा संघ ब्रँडनचा करार वाढवण्यास इच्छुक होता, परंतु काही बाबींवर सामंजस्य होऊ शकले नाही आणि त्यामुळे करार संपुष्टात आला. हा निर्णय कठोर ठरला,’ अशी माहिती एफसी गोवा संघ सूत्रांकडून मिळाली.

Brandon Fernandes
Brandon FernandesKishor Petka
Brandon Fernandes | FC Goa
Sea Turtle Conservation: कासव संवर्धन मोहिमेला मोरजी किनाऱ्यावर यश! 13,000 पिल्लांना सोडले समुद्रात

एफसी गोवा संघाचा आधारस्तंभ

ब्रँडनने २०१५ मधील आयएसएल स्पर्धेत मुंबई सिटीतर्फे पदार्पण केले होते. या संघातर्फे तो फक्त दोन सामन्यांत ६१ मिनिटे खेळू शकला. २०१७ मध्ये आयएसएल ड्राफ्टमध्ये या अनुभवी मध्यरक्षकाची एफसी गोवाने निवड केली.

तेव्हापासून तो गोव्यातील संघाचा अविभाज्य भाग बनला. २०२१ मध्ये एफसी गोवाने ब्रँडनचा करार जून २०२४ पर्यंत वाढविला होता. तो एफसी गोवातर्फे १० क्रमांकाच्या जर्सीत लोकप्रिय ठरला.

आयएसएल स्पर्धेत ब्रँडन एफसी गोवातर्फे एकूण १०९ सामने खेळला, त्याने ११ गोल केले, तर २५ असिस्टची नोंद केली. या संघासाठी तो आधारस्तंभ ठरला. मागील दोन मोसम तो संघाचा कर्णधार होता.

मुंबई सिटीविरुद्धच्या यावेळच्या उपांत्य लढतीपूर्वी ब्रँडनने पत्रकार परिषदेत सांगितले होते, की ‘‘एफसी गोवासमवेतचा प्रवास अविश्वसनीय आहे. या संघाचे मी नेतृत्व केले. प्रत्येकवेळी सर्वोत्तम योगदान देण्यासाठी कटिबद्ध राहिलो.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com