Bicholim Landslide: डिचोली बगलमार्गावर कोसळली दरड! अनर्थ टळला; सुरक्षिततेबाबत प्रश्‍‍नचिन्‍ह

Bicholim Valshi Landslide: धोका ओळखून दरड कोसळलेल्या परिसरात डोंगराच्‍या कडा कापण्यात आल्या. सध्या बगलमार्गाच्या दोन्ही बाजूने जोडरस्त्यांचे काम सुरू आहे.
Bicholim Valshi landslide
Bicholim Valshi landslideDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: येथील चौपदरी बगलमार्गावर पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडली, मात्र ती रेलिंगला अडकून राहिल्याने संभाव्य अनर्थ टळला आहे.

वर्षभरापूर्वी पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडल्याने हा बगलमार्ग पुन्हा चर्चेत आला आहे. वर्षांपूर्वी दरड कोसळली होती, तेथून साधारण एक किलोमीटर अंतरावर व्हाळशीच्या बाजूने ही दरड कोसळली आहे.

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास व्हाळशी या बगलमार्गावरील नाईकनगर परिसरात व्हाळशीच्या दिशेने जाताना डाव्या बाजूने ती कोसळली. मात्र त्‍यामुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही.

Bicholim Valshi landslide
Goa Highway: 3 महिन्यांत हायवेची संरक्षक भिंत खचली, वाहनधारकांत भीती; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

वर्षापूर्वी म्हणजेच गेल्या वर्षी ६ जून रोजी वाठादेव ते व्हाळशी या बगलमार्गाचे लोकार्पण करण्यात आले. त्‍यानंतर महिन्याच्या आत म्हणजेच २७ जून रोजी २४ तासांच्या अवधीत दोन ठिकाणी दरडी कोसळल्‍या होत्‍या.

Bicholim Valshi landslide
Mumbai Goa Highway: 'कोकणच्या माणसाची कोणाला पडलेलीच नाहीय...', महामार्गावर खड्डेच खड्डे; मनसे नेत्यानं शेअर केला Video

त्यावेळीही मोठी दुर्घटना टळली होती. त्यानंतर धोका ओळखून दरड कोसळलेल्या परिसरात डोंगराच्‍या कडा कापण्यात आल्या. सध्या बगलमार्गाच्या दोन्ही बाजूने जोडरस्त्यांचे काम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com