करंझोळ येथे दरड कोसळली; रद्द झालेल्या गाड्या कोणत्या, पर्यायी व्यवस्था काय?

पावसामुळे दरड हटविण्याच्या कामात अडचण निर्माण झाली आहे.
Railways
RailwaysDainik Goamantak
Published on
Updated on

ब्रागांझा घाट विभागातील कॅसलरॉक - करंझोळ स्थानकादरम्यान मंगळवारी दरड कोसळल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे विविध ट्रेनच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत रेल्वेमार्गावरील दरड हटविण्याचे काम सुरू होते.

पावसामुळे दरड हटविण्याच्या कामात अडचण निर्माण झाली आहे. रेल्वे मार्गात बदल करण्यात आल्यामुळे प्रवाशांसाठी बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

रद्द करण्यात आलेली ट्रेन

यशंवतपूर ते वास्को-द-गामा मार्गावर धावणारी ट्रेन नंबर 17309 आणि वास्को-द-गामा ते यशंवतपूर धावणारी ट्रेन  क्रमांक 17310, दररोज धावणारी ही ट्रेन 29 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे.

निश्चित स्थानापूर्वी थांबणाऱ्या ट्रेन

27 जुलै रोजी धावणारी शालिमार - वास्को-द-गामा अमरावती एक्सप्रेस हुबळी येथे थांबेल. तर, 30 जुलै रोजी शालिमारला जाणारी अमरावती एक्सप्रेस वास्को-द-गामा ऐवजी हुबळी येथून सुटेल. अशी माहिती

Railways
Monalisa In Goa: भोजपुरी ब्युटी मोनालिसाचा गोव्यातील 'बोल्ड' अवतार व्हायरल, पाहा फोटो

याशिवाय 28 जुलै रोजी सुटणारी कचेगोडा - वास्को-द-गामा हुबळी येथे थांबेल आणि 30 जुलै रोजी सुटताना ती हुबळी येथूनच सुटेल अशी माहिती रेल्वेने दिली आहे.

Railways
हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी एक कंपनी; गोवा, सिंधुदुर्ग, नांदेड, पुणे विमानसेवा सुरू होणार

दरम्यान, दरड कोसळल्यामुळे निश्चित स्थानकापूर्वी ट्रेन हुबळी येथे थांबवल्या जात आहेत. त्यामुळे गोव्यात येणाऱ्या प्रवाशांना अडचण येत आहे. दरम्यान, रेल्वे खात्याने याची दखल घेत प्रवाशांसाठी मोफत बससेवा आयोजित केली.

हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस वास्को ऐवजी बेळगाव येथे थांबली त्यातून आलेल्या 255 प्रवाशांसाठी दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाच्या वतीने आठ बस मोफत आयोजित करण्यात आल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com