Lala Ki Basti Goa: "रमजान असो वा रामनवमी लाला की बस्ती हटणारच" मंत्री हळर्णकरांची घोषणा!

Lala Ki Basti Thivim: थिवीचे आमदार आणि मत्स्य विभागाचे मंत्री नीलकंठ हळर्णकर यांनी महत्वाचे विधान केले
Illegal Land Goa
Illegal Land GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Nilkanth Halankar on Lala ki Basti

थिवी: वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी कोलवाळ पोलिसांनी थिवी येथील लाला की बस्ती या परिसरात गुरुवारी (ता. 23) भाडेकरू पडताळणी मोहीम राबवली होती. यानंतर आता थिवीचे आमदार आणि मत्स्य विभागाचे मंत्री नीलकंठ हळर्णकर यांनी महत्वाचे विधान केले आहे. उत्सव काहीही असला तरीही ही वस्ती हटवली जाणारच अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिलीये.

काय म्हणाले हळर्णकर?

थिवीचे आमदार नीलकंठ हळर्णकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कोमुनिदादच्या सदस्यांनी लाला की बस्ती येथील कोमुनिदाद भागातील जमीन विकत घेतल्याचा वाद उच्च न्यायालयात नेला होता आणि वर्ष २०१०मध्ये ही वस्ती पाडली जाणार होती, मात्र एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात गेल्याने ही कारवाई लांबणीवर पडली.

Illegal Land Goa
Lala Ki Basti Goa: 'लाला की बस्ती'तून 96 जणांना अटक; कोलवाळ पोलिसांची भाडेकरुंची तपास मोहीम

न्यायालयाने कोमुनिदाद जमिनीच्या मालकांच्या वतीने निर्णय दिल्याने ही वस्ती हटवली जाणार आहे. या भागात एकूण ३६ घरं असण्याची शक्यता मंत्री हळर्णकर यांनी व्यक्त केलीये.

रमजान असला तरीही वस्ती हटवणार!

या चर्चेच्यावेळी पत्रकारांनी मंत्री हळर्णकर यांना लाला की बस्ती येथे असलेल्या बहुसंख्यिक मुस्लिम समाजाबद्दल प्रश्न केला. सध्या सगळीकडेच रमजान साजरा केला जातोय, यामुळे वस्ती हटवण्याची प्रकारीया लांबणीवर पडेल का? असा प्रश्न मंत्र्यांना विचारण्यात आला होता. मात्र या प्रश्नावर उत्तर देताना हळर्णकर म्हणालेत की रमजान असो किंवा रामनवमी असो, वस्ती हटवली जाणारच आहे.वर्ष २०१० मध्ये खरंतर ही वस्ती पडणार होती मात्र आता याला जवळपास पंधरा वर्ष उलटून गेलीयेत त्यामुळे काहीही असलं तरी ही वस्ती पडणार हे निश्चित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com