लईराई देवीच्या जत्रोत्सवाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात, शिरगावात उत्साहाचे वातावरण; मंदिरामागे 'बॅरिकेड्‌स'ची व्यवस्था, दुकाने थाटण्यास प्रारंभ

Lairai Devi Jatra: शिरगाव येथील श्री लईराई देवीची जत्रा तीन दिवसांवर आल्याने सध्या शिरगावात जत्रेचा माहोल तयार झाला.
Lairai Devi Jatra
Lairai Devi JatraDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: शिरगाव येथील श्री लईराई देवीची जत्रा तीन दिवसांवर आल्याने सध्या शिरगावात जत्रेचा माहोल तयार झाला असून, उत्साहवर्धक वातावरण पसरले आहे. जत्रेची तयारी जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

लईराईची जत्रा निर्विघ्नपणे साजरी व्हावी, यासाठी देवस्थान समितीसह प्रशासन ‘सतर्क’ झाले आहे. देवस्थान समितीसह प्रशासकीय यंत्रणा सध्या जत्रेच्या तयारीचा पाठपुरावा करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. सध्या गोव्यासह महाराष्ट्रातील विविध भागातील भाविकही शिरगावात येऊन देवीच्या चरणी सेवा अर्पण करू लागले आहेत.

Lairai Devi Jatra
Goa Municipal Elections: पालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये? कायद्यात दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मंजुरी; वटहुकूम लवकरच जारी होणार

गेल्या वर्षीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा शिरगावात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार देवस्थान समितीने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यंदा प्रथमच श्री लईराई देवीच्या मागच्या बाजूने ‘बॅरिकेड्‌स’ची व्यवस्था करण्यात आली आहे. या ‘बॅरिकेड्‌स’मुळे भाविकांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे.

जत्रेचा दिवस जवळ आल्याने सध्या शिरगावात दुकाने घालण्यास सुरवात झाली आहे. यंदा जत्रेच्या दिवशी श्री लईराई देवी मंदिराच्या मागील बाजूने २५ तर होमकुंड स्थळाजवळ ९ दुकाने घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. जत्रेच्या दुसऱ्या दिवसापासून देवीचे पुन्हा मंदिरात आगमन होईपर्यंत चार दिवस प्रशासनाच्या निर्णयानुसार अतिरिक्त दुकाने घालण्यास मिळणार आहेत.

Lairai Devi Jatra
Goa Tourism: जानेवारी, फेब्रुवारीत पर्यटक 'फुल्ल'! मार्चला 'युद्धा'चा फटका; गतवर्षीच्या तुलनेत पहिल्‍या तिमाहीत 32,500 पर्यटकांची वाढ

धोंड तळीवर आंघोळीस तात्पुरती बंदी

जत्रेच्या पार्श्वभूमीवर शिरगावमधील पवित्र धोंड तळीवर आंघोळ करण्यासाठी तूर्त तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तसा सूचना फलकही तळीच्या ठिकाणी लावण्यात आला आहे. एरव्ही जत्रेपूर्वी वेगवेगळ्या भागातील व्रतस्थ धोंड भक्तगण या तळीवर येऊन आंघोळ करीत असत.

यंदा मात्र जत्रेच्या पूर्वदिनीपर्यंत तळीत आंघोळ करायला मिळणार नाही. जत्रेदिवशी मात्र या तळीत आंघोळ करण्यासाठी धोंड भक्तगणांची गर्दी उसळणार आहे. स्वच्छतेच्या कारणास्तव सध्या तळीत उतरायला आणि आंघोळ करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने तळीच्या काठी ‘रेलिंग’ घालण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com