गोव्यात आता सहावी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना 'लैंगिक हिंसेपासून बचाव आणि पौगंडावस्था' यावर शिक्षण

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या शिफारशींनुसार लैंगिक समानतेवर भर दिला जात आहे.
Sex Education
Sex Education dainik gomantak

गोव्यात इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात 'लैंगिक हिंसेपासून बचाव आणि पौगंडावस्था' या विषयांचा समावेश केला जाणार आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून ही अमंलबजावणी केली जाईल. गोवा समग्र शिक्षा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, केंद्र सरकारच्या जननी योजनेंतर्गत ही सुधारणा करण्यात आली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या शिफारशींनुसार लैंगिक समानतेवर भर दिला जात आहे. त्यानुसार शाळांना अभ्यासक्रम तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मुली आणि मुलांना योग्य स्पर्श आणि अयोग्य स्पर्श, पौगंडावस्थेत शरीरात होणारे बदल याबाबत थडे दिले जाणार आहेत. तसेच, पौगंडावस्थेतील आहार आणि पोषण याविषयी शिक्षण दिले जाईल. तर मुलींना, काही अतिरिक्त विषय शिकवले जातील. यामध्ये लैंगिक हिंसाचारापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, मासिक पाळी दरम्यान स्वच्छता आणि काळजी कशी घ्यावी अशा विषयांचा समावेश असेल.

अभ्यासक्रमाचा समन्वय साधण्यासाठी शाळा प्रमुखांना वरिष्ठ महिला शिक्षिकेची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जननी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी गोव्यातील सरकारी, अनुदानित आणि उच्च माध्यमिक शाळांना 5,000 रुपये दिले जाणार आहेत.

Sex Education
Tata Power: गोव्यातील EV धारकांसाठी महत्वाची बातमी; राज्यभरात टाटा उभारणार तब्बल 100 चार्जिंग स्टेशन्स

शाळेतील 12 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांतर्गत समाविष्ट करण्यास सांगितले आहे. किमान 50 मुलींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे आवश्यक आहे.

“किशोरवयीन मुलींना शिक्षित करणे हाच त्यांचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवण्याचा एकमेव मार्ग आहे. यातूनच त्यांना महिलांशी संबंधित समस्यांचा परिचय करून देता येईल. जननी योजनेंतर्गत किशोरवयीन मुलींना त्यांच्यात होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक बदल आणि त्या बदलामागील वैज्ञानिक कारणे समजून घेण्यास मदत होईल,” असे शाळांना दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com