Aleixo Sequeira: गोवा कायदामंत्र्यांचा नवा वाद! म्हणाले, 'ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी सरकारी खात्यात नाही समन्वय'

Goa Noise Pollution: लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू असे आश्वासन सिक्वेरा यांनी दिले
Goa Noise Pollution: लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू असे आश्वासन सिक्वेरा यांनी दिले
Aleixo SequeiraGoemkarponn
Published on
Updated on

पणजी: ‘सर्वत्र अमलीपदार्थ उपलब्ध असतात’ या कायदामंत्री आलेक्स सिक्वेरांच्या विधानाबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘त्यांची जीभ घसरली होती’, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असतानाच सिक्वेरा यांनी आज नवा वाद निर्माण केला आहे.

रात्री १० नंतर होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला अटकाव घालण्यासाठी राज्य सरकाराच्या विविध खात्यांचा समन्वय नाही, असे त्यांनी सांगून टाकले आहे. त्यामुळे सरकारी कारभाराचा विद्रूप चेहरा सर्वांसमोर आला आहे.

मडगाव येथे पत्रकारांशी बोलताना सिक्वेरा यांनी सर्वत्र अमली पदार्थ मिळतात, त्यासाठी संपर्क कशाला हवा, असे विधान केले होते. त्यानंतर सर्व करताना त्यांनीच आपल्याला ‘सर्वत्र’ म्हणजे ‘जगभरात’ असे म्हणायचे होते, असे सांगून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनीही कायदामंत्र्यांची जीभ घसरली, असेल असे सांगून याविषयातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

तरीही त्यांनी आता १०नंतर होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या बाबतीत कारवाई करण्यासाठी यंत्रणा बसवली आहे. मात्र, कारवाई ही जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर केली जाते, असे सांगून विविध खात्यांत याविषयी समन्वय नसल्याची कबुली दिली आहे. त्यांनी यासाठी लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू, असे आश्वासनही दिले आहे.

सरकारने कारवाई करायचे ठरवले तर विविध यंत्रणा एकाच वेळी कामाला लागतात, असा जनतेचा अनुभव आहे. यामुळे पर्यावरण खात्याने दोन्ही प्रदूषणाविषयी कारवाई करण्याचे ठरवले तर त्याला महसूल खात्याची साथ मिळत नाही, असे चित्र सिक्वेरा यांच्या विधानानंतर उभे राहिले आहे. यापूर्वी विधेयके तयार करण्यावरून पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी कायदा खात्यावर बोट ठेवले होते. त्यालाही जाहीरपणे सिक्वेरा यांनी प्रत्युत्तर दिले होते.

Goa Noise Pollution: लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू असे आश्वासन सिक्वेरा यांनी दिले
Anjuna Water Crisis: मुसळधार पावसात हणजूण-कायसूवमध्‍ये पाणीटंचाई

सत्ताधारी गोटात अशांततेचे वातावरण

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सरकारमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे जाहीरपणे सांगून टाकले होते. त्यांना जाब विचारण्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी लोबो यांचे घर गाठले. मात्र, लोबो यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असे सांगत तानवडे यांनी त्यांना त्यांचे काही चुकले नाही, असे प्रमाणपत्र दिले.

अलीकडच्या या काही घटनांमुळे सत्ताधारी गोटामध्ये असलेली अशांतता उफाळल्याचे दिसून येते. मध्यंतरी सिक्वेरा यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची चर्चा सुरू झाली होती. त्याची कुणकूण लागल्यामुळे ते सत्य सांगत असावेत, असा टोला आता समाजमाध्यमावर हाणला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com