Mandovi Bridge Accident: जुन्या मांडवी पुलावर मद्यधुंद कारचालकाचा थरार! भरधाव वेगात मजुरांना उडवले; एकाचा जागीच मृत्यू

Mandovi Drink And Drive Case: याप्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद कारचालकला अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे
Mandovi Drink And Drive Case: याप्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद कारचालकला अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
Goa Mandovi Bridge Drink And Drive Accident Death CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Mandovi Drink And Drive Case

पणजी: येथील जुन्या मांडवी पुलावर बुधवारी मध्यरात्री जेट पॅचर मशीनने खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना भरधाव वेगाने आलेल्या मद्यधुंद कारचालकाने तिघा मजुरांना जोरदार धडक दिली. यात अमित यादव याचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे मजूर गंभीर जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. कारचालक संकेत शेट हा मद्य प्यायल्यानंतर पर्वरीत शॉरमा खायला जाताना हा अपघात घडला.

याप्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद कारचालक संकेत चंद्रकांत शेट (वय ३७ वर्षे, रा. वळवई) याला अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्लीच सरकारने गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते आणि संबंधित कंत्राटदारांना दिले होते.

त्यानुसार संबंधित कंत्राटदारांनी जेट पॅचर मशीनच्या साहाय्याने हे खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. बुधवारी मध्यरात्री जुन्या मांडवी पुलावर अभयराय निर्मल, अमित यादव (२५) आणि धीरज शर्मा हे तिघे मजूर काम करत होते.

यावेळी पणजीहून पर्वरीकडे जाणाऱ्या कारचालकाने थेट खड्डे बुजविण्याचे काम करणाऱ्या तिघा मजुरांना धडक दिली. या धडकेने तिन्ही मजूर कार आणि जेट पॅचर मशीन यामध्ये चिरडले गेले. यात अमितचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे मजूर गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

कारचालकाची म्हापसा येथील इस्पितळात अल्कोमीटर चाचणी केली असता, त्यामध्ये त्याने प्रमाणापेक्षा अधिक मद्य घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ही धडक इतकी जबरदस्त होती की, कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. जेट पॅचर मशीनचेही नुकसान झाले. याप्रकरणी पोलिस तपास निरीक्षक विजय चोडणकर करत आहेत.

दरम्यान, बाणस्तारी पुलाजवळ एका वर्षापूर्वी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मर्सिडिज कारचालकाने समोरून येणाऱ्या वाहनांना ठोकर दिली होती. या अपघाताचा तिघांचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले होते. या घटनेला एक वर्ष उलटून गेले तरी अजूनही न्यायालयात संशयिताविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल झालेले नाही.

काही महिन्यांपूर्वी वेर्णा येथे एका मद्यधुंद बसचालकाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोलीला धडक दिल्याने चारजणांचा मृत्यू झाला होता. गोव्यात नव्याने रुजू झालेल्या पोलिस महासंचालकांनी मांडवी पुलावरील या अपघाताची गंभीर दखल घेत त्वरित आरोपपत्र दाखल करण्याचे आश्‍वासन दिले आहे. अपघातात मृत्यू झालेल्या अनेक प्रकरणांत वर्षानुवर्षे काही अहवालांमुळे न्यायालयात आरोपपत्रे दाखल होत नाहीत, असे आढळून आले आहे.

पोलिस, रुग्णवाहिकेस विलंब

मांडवी पुलावरील हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे तसेच तो मद्यधुंद असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने झाला आहे. याची गंभीर दखल पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी घेतली आहे. या अपघाताचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत करून लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल. अपघाताची माहिती मिळताच पोलिस त्या ठिकाणी किती वेळेत पोचले, याचीही माहिती कुमार यांनी मिळवण्यास सांगितले आहे. अपघाताच्या ठिकाणी पोलिस तसेच १०८ रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब झाल्याने लोकांनी संताप व्यक्त केला होता.

‘साबांखा’ने पोलिस खात्याला कळविलेच नाही

अपघातात मृत्यू व जखमी झालेले कामगार हे उत्तर प्रदेशमधील आहेत. दिवसा पुलावर वाहनांची वर्दळ असल्याने कंत्राटदाराने रात्रीच्यावेळी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी या तिघांकडे काम सोपविले होते. मात्र, या कामासंदर्भातील माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याने वाहतूक पोलिसांना दिली नव्हती. त्यामुळे तेथे वाहतूक पोलिस तैनात केले नव्हते. कंत्राटदाराने रस्त्यावर लाल रंगाचे रेडियमचे त्रिकोण उभे करण्यास कामगारांना सांगितले होते.

पर्वरीतील हॉटेलाकडे जाताना दुर्घटना

संशयित कारचालक संकेत शेट याची आज चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने टोंक-करंझाळे येथील टेम्प्टेशन या रेस्टॉरंटमध्ये रात्री उशिरापर्यंत बियर्स घेतल्या. त्यानंतर पर्वरी येथील एका हॉटेलात शॉरमॉ खाण्यासाठी जात होता, असे सांगितले. प्राथमिक तपासणीत त्याने मद्य घेतल्याचे उघड झाले. मात्र, त्याच्या रक्तचाचणीचा अहवाल उद्यापर्यंत येईल. त्यानंतरच त्याने किती प्रमाणात मद्य घेतले होते त्याचे निदान होईल.

Mandovi Drink And Drive Case: याप्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद कारचालकला अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
Goa Drink And Drive: मद्यपी चालकाने घेतला सासरा-सुनेचा बळी; केपेत भीषण अपघात

लाल दिवे होते, तरीही अपघात...

बुधवारी मध्यरात्री मांडवी पुलावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. तेथे लाल रंगाचे चमकणारे ‘रेडियम’ असलेले त्रिकोण लावले होते. वाहनचालकांना काम सुरू आहे, ते दिसावे म्हणून ते लावले होते. मात्र, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाला हे ‘त्रिकोण’ दिसले की नाहीत, हा चर्चेचा विषय होता. मद्यधुंद अवस्थेतील चालक अपघातानंतर उभा राहण्याच्या व बोलण्याच्याही स्थितीत नव्हता.

Mandovi Drink And Drive Case: याप्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद कारचालकला अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
Vasco Drink And Drive Case: पुन्हा ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’! भरधाव कार शटर तोडून रेस्टॉरंटमध्ये घुसली

कामगार आयुक्तांनी घेतली दखल

मांडवी पुलावरील अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाल्याने त्याची दखल कामगार आयुक्तांनी घेतली आहे. आयुक्त डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांनी सांगितले की, कामाच्या ठिकाणी कामगारांच्या संरक्षणाची कोणती व्यवस्था होती, याची विचारणा करण्यात येणार आहे. यासाठी कंत्राटदार आणि संबंधित अभियंता यांना नोटीसा बजावून त्यांचे म्हणणे जाणून घेतले जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com