Labor welfare board announced 16 schemes for education of industrial workers' children and welfare of workers
Labor welfare board announced 16 schemes for education of industrial workers' children and welfare of workers Dainik Gomantak

Goa Labor Welfare Board: कामगार मंडळाकडून कामगारांसाठी 16 योजना जाहीर; डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांच्याकडून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Industrial Workers: ज्या कामगारांनी अखंडित ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ सेवा बजावली आहे, तेच कामगार या योजनांसाठी पात्र आहेत.
Published on

Goa Labor Welfare Board: राज्यातील कामगार कल्याण मंडळातर्फे औद्योगिक कामगारांच्या मुलांचे शिक्षण तसेच कामगारांच्या कल्याणासाठी १६ योजना जाहीर करण्यात आल्या असून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य कामगार आयुक्त डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांनी केले आहे.

ज्या कामगारांनी अखंडित ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ सेवा बजावली आहे, तेच कामगार या योजनांसाठी पात्र आहेत. इच्छुक कामगारांंनी कंंपनीमार्फत सचिव, गोवा कामगार कल्याण मंंडळ, श्रमशक्ती भवन, चौथा मजला, पाटो - पणजी याठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे.

Labor welfare board announced 16 schemes for education of industrial workers' children and welfare of workers
Goa Construction Workers Welfare: गरोदर महिला कामगारांसाठी मातृत्व लाभात वाढ! अपघातग्रस्तांनाही मिळणार आर्थिक मदत

औद्योगिक कामगारांसाठी अर्थासाह्य,अभ्यासदौरे

औद्योगिक कामगारांसाठी अभ्यास दौरे आयोजित करण्यासाठी मदत, औद्योगिक कामगारांच्या मुलांसाठी संगोपन मदत, औद्योगिक कामगारांच्या मतिमंद मुलांवर उपचारासाठी मदत,. दहावी नंतर गुणांच्या टक्केवारी प्रमाणे आर्थिक मदत आदी योजनाही मार्गी लावण्यात आल्या आहेत.

क्षयरोगासाठी निवासी स्वरूपाच्या उपचारासाठी कामगार कायद्याप्रमाणे मदत, पाचवी व पुढच्या वर्गात शिकणाऱ्या कामगारांच्या मुलींसाठी हजेरी प्रमाणे आर्थिक मदत, कामावरून कपात केलेल्या कामगारांना आर्थिक मदत योजनाही लागू करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com