Goa Construction Workers Welfare: गोवा बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे गरोदर महिलांसाठी आर्थिक निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. नोंदणीकृत गरोदर महिला कामगारांसाठी मातृत्व लाभ आता 10,000 रुपयांवरून 30,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला आहे.
काल (गुरुवारी) गोवा पर्वरीतील मंत्रालयात इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची बैठक कामगार आणि रोजगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
मंडळाने कामगारांसाठी असलेल्या इतर फायदेशीर उपक्रमांनाही मान्यता दिली आहे; ज्यामध्ये अपंगत्व निवृत्ती वेतनाचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच, अर्धांगवायू, कुष्ठरोग, क्षयरोग किंवा अपघात यांसारख्या कायमस्वरूपी अपंगत्वाचा सामना करणाऱ्या कामगारांना दरमहा मासिक पेन्शन म्हणून 5,000 रुपये आणि अंशतः अपंगत्वासाठी 3,000 रुपये देण्यात येणार आहेत.
कामावर असताना अपघात झाल्यास सदर कामगारांना पहिल्या 5 दिवसांसाठी 3,000 रुपये आणि त्यानंतर दिवसाला 500 रुपये देण्यात येणार आहे. तसेच अपघातामुळे अपंगत्व आल्यास, पात्र कामगारांना आर्थिक सहाय्य मिळू शकते, ज्याची कमाल मर्यादा 30,000 रुपये आहे, असेही या बैठकीत सांगण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.