Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Cuncolim IDC News: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत कामगार खात्याने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. चार कामगार निरीक्षकांनी दोन कंपन्यांची कसून तपासणी केली. तसेच त्यांनी १५ कामगारांच्या जबान्याही नोंदवून घेतल्या. मात्र तेथील परिस्‍थिती ओंगळवाणी दिसून आली.
Cuncolim IDC News
Cuncolim IDCDainik Gomantak
Published on
Updated on

Inspection Reveals Poor Working Conditions in Cuncolim Industries

पणजी: वाढत्‍या प्रदूषणामुळे सातत्याने चर्चेत असलेल्या कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या ठिकाणी कामगारविषयक कायदे-नियमांचे पालन होते की नाही, यासाठी कामगार खात्याने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. आज चार कामगार निरीक्षकांनी दोन कंपन्यांची कसून तपासणी केली. तसेच त्यांनी १५ कामगारांच्या जबान्याही नोंदवून घेतल्या. मात्र तेथील परिस्‍थिती ओंगळवाणी दिसून आली. कामगार तेथेच राहतात, जवळच स्‍नान करतात, सर्वत्र अस्‍वच्‍छताच दिसून आली.

या औद्योगिक वसाहतीत सुमारे ४०० परप्रांतीय कामगार राहत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला होता. त्याची दखल घेत एवढ्या मोठ्या संख्‍येने कामगार वसाहतीत राहतात की नाही, याची पाहणी करण्यासाठी कामगार आयुक्त डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांच्या आदेशानुसार ही पाहणी सुरू करण्‍यात आली आहे.

मडगावचे कामगार उपायुक्त प्रसाद पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार निरीक्षक सचिन देसाई, प्रितेश बोरकर, नयनेश देसाई आणि प्रकाश मराठे यांनी ही तपासणी केली. नयनेश व प्रकाश यांना यासाठी पणजीहून पाठविले होते.

अधिकाऱ्यांनी टिपली ओंगळवाणी छायाचित्रे

कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीवेळी कंपन्यांच्या मागेच कामगार राहत असल्याचे आढळून आले. त्यांची राहण्याची व्यवस्था व स्वच्छतागृहेही तेथेच आहेत. या सर्वांची छायाचित्रे टिपली आहेत. त्यातून तेथील बिकट स्थिती सरकारपर्यंत पोचणार आहे. अचानकपणे ही तपासणी झाल्याने कंपन्यांना सर्वच बाबी लपविणे शक्‍य झाले नाही. कामगारांना लपविणे, त्‍यांना दुसऱ्या कंपनीत पाठविण्‍याचाही प्रयत्‍न झाला. निरीक्षकांना कंपनीत येण्‍यासही मज्जाव करण्‍यात आला. पण त्‍यांनी दम दिल्‍यावर आत सोडण्‍यात आले. उद्या अन्य कंपन्यांच्या तपासणीवेळी चांगले, सुरक्षित वातावरण दाखवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

Cuncolim IDC News
Cuncolim Industrial Estate: मासळीची वाहने पुन्हा अडवली, असह्य दुर्गंधीने कुंकळ्ळीवासीय हैराण; पोलिसांकडून तपासणी

‘श्रद्धा इस्पात’, ‘सनराईज’ची पाहणी

‘श्रद्धा इस्पात’ आणि ‘सनराईज’ या दोन कंपन्‍यांची पाहणी तसेच तपासणी आज करण्‍यात आली. परप्रांतीय कामगारांना नियुक्त करताना त्याविषयीचा परवाना कंत्राटदाराकडे आहे का? कंत्राटी कामगारांची नोंदणी केली आहे का? कामाचे तास किती? कामगार कुठे राहतात? कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखली जाते का? कामगारांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केली आहे का? याची पाहणी करण्यात येत आहे. उद्या शुक्रवारीसुद्धा पाहणी करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com