Vasco Railway : रेल्वे दुपदरीकरणाचा ‘ट्रॅक’ मोकळा; आंदोलकांना झटका

पर्यावरणाच्या आक्षेप हरकती फेटाळल्या, उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
Railway Station
Railway Station Dainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळलेला कुळे ते वास्को पश्चिम दक्षिण रेल्वे दुपदरीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासंबंधी नेमलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने आंदोलकांचे पर्यावरणासंबंधीचे सर्व आक्षेप फेटाळले आहेत. त्यामुळे आंदोलकांना जबर झटका बसला आहे.

दुपदरीकरणासाठी कुडचडे, काकोडा, सावर्डे, शेळवण, सां जुझे दि आरियल, चांदोर, गिरदोली आणि वेळसांव या गावांमधील एकूण 0.9985 हेक्टर जमीन संपादित केली जाईल.

उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय, वास्को यांनी हॉस्पेट-हुबळी - तिनईघाट - वास्को- द- गामा दुपदरीकरण या विशेष रेल्वे प्रकल्पासाठी हा निर्णय घेतला असून यासंबंधीचे सर्व आक्षेप आज फेटाळण्यात आले आहेत.

Railway Station
Atal Setu Closure: अटल सेतूवर वाहतुकीस पुढील 7 दिवस No Entry

हा प्रकल्प रेल्वे विकास निगम लिमिटेडद्वारे प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे अशा क्षेत्राचे भूसंपादन करण्यासाठी उपजिल्हाधिकारी (मुरगाव) यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यासंबंधी वेळसांवसह इतर पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी पर्यावरणाचे कारण देत आक्षेप नोंदवला होता.

रेल्वेचे काम बंद पाडण्याचा प्रयत्नही नागरिकांना केला होता. या विषयावरून पोलिस आणि नागरिकांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या होत्या. त्यामुळे दुपदरीकरणाचा वाद चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.

75 टक्के काम पूर्ण

रेल्वे खात्याच्या माहितीनुसार, दुपदरीकरणासाठी 352.58 किमी हॉस्पेट-हुबळी- लोंढा- वास्कोपर्यंत असे 75.16 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी 3,692.60 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

Railway Station
Gudhi Padwa 2023: नववर्षाच्या दिवशी घरात आणा 'या' वस्तु, लाभेल सुख-समृद्धी

पर्यावरणाचे 20 आक्षेप फेटाळले

भूसंपादन प्राधिकरणाने दुपदरीकरणासंबंधीचे 20 आक्षेप फेटाळले आहेत. कुळे ते वास्को मार्गाच्या दुपदरीकरणासाठी प्रस्तावित भूसंपादन अधिसूचनेबाबत नागरिकांनी एकूण 26 आक्षेप नोंदवले आहेत.

या 26 आक्षेपांपैकी 20 आक्षेप पर्यावरणीय समस्यांशी संबंधित होते आणि रेल्वे दुपदरीकरणानंतर खनिज वाहतुकीत संभाव्य वाढ होणार आहे. इतर सहा आक्षेप प्राधिकरणाच्या कक्षेत नाहीत, असे सांगून फेटाळण्यात आले आहेत.

"केंद्र सरकारच्या नियुक्त अधिकाऱ्यांनी कायदेशीर बाबींना बगल देत हा निर्णय दिला आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेड आता संबंधित प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता खासगी मालमत्तांमध्ये अतिक्रमण करत आहे. आता लोकशाही उरली नसून केवळ अराजकता माजली आहे. या निर्णयावर आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करत आहोत."
- ऑर्विल रॉड्रिग्स, गोंयचो एकवोट.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com