Waste Processing Plant: हिरवाईने नटलेला गाव उद्‍ध्वस्त करु नका! कुडचिरेवासीयांना गोवा फॉरवर्डचा पाठिंबा

Goa Forward: स्थानिकांची दिशाभूल केली आहे, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे उत्तर गोवा सरचिटणीस संतोष सावंत यांनी केली
Kudchire|Goa Forward
Kudchire|Goa ForwardDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Kudchire Waste Plant

पणजी: कुडचिरे येथे कोणत्याही प्रकारचा प्रकल्प स्थानिकांवर बळजबरीने लादून तेथील हिरवाईने नटलेला गाव उद्‍ध्वस्त करण्यात येऊ नये. स्थानिक ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध आहे. कचरा प्रकल्पासाठी किती तरी खाणपपट्ट्यात खंदक आहेत तेथे ते सुरू करण्यात यावेत.

प्रकल्पाविरोधात लोकांनी उभारलेल्या आंदोलनाला गोवा फॉरवर्डचा पाठिंबा असेल. या प्रकल्पाला स्थानिक आमदाराचा पाठिंबा असल्याने त्यांनी स्थानिकांची दिशाभूल केली आहे, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे उत्तर गोवा सरचिटणीस संतोष सावंत यांनी केली.

Kudchire|Goa Forward
Illegal Stone Mining: कचरा प्रकल्पाने कुडचिरेत हानी मग बेकायदा चिरेखाणींकडे का दुर्लक्ष? दबाव की जाणीवपूर्वक कानावर हात?

या कचरा प्रकल्पाला विरोध होत असल्याने तो तेथे उभारण्यात येऊ नये अशी मागणी करणारे निवेदन गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर सावंत म्हणाले की, कुडचिरे येथे प्रकल्प उभारण्यासंदर्भात मोठ्या पोलिस फौजफाट्यासह सर्वे करण्यात आला होता. लोकांनी त्याला विरोध केला होता तरीही पोलिस बंदोबस्तात सर्वे केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Forward Congress Merger Proposal
Goa First Secular Alliance
Goa First Alliance Formation
Goa First Alliance 2027
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com