Rudreshwar Rathotsav Goa 2025
Rudreshwar Temple HarvalemDainik Gomantak

Rudreshwar Rathotsav: भाविकांच्या अलोट गर्दीत रुद्रेश्वराच्या रथोत्सवाला प्रारंभ! 21 दिवस चालणार यात्रा

Rudreshwar Temple Harvalem: ७ ते २७ जानेवारी असे २१ दिवस ही रथोत्सव यात्रा चालणार आहे. आज हरवळे येथून रथयात्रा डिचोलीमार्गे थेट अस्नोडा येथे संध्याकाळी दाखल होणार आहे
Published on

साखळी: हरवळे येथील श्री देव रुद्रेश्वराच्या रथोत्सवाला आज संध्याकाळी हरवळे येथून प्रारंभ झाला. श्री रुद्रेश्वराच्या मोठ्या संख्येने भाविक भक्तांची यावेळी उपस्थिती होती. सकाळपासून या सोहळ्यासाठी मंदिरात विविध धार्मिक विधी झाले. सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विशेष उपस्थिती लावून श्रींचा अभिषेक केला.

७ ते २७ जानेवारी असे २१ दिवस ही रथोत्सव यात्रा चालणार आहे. आज हरवळे येथून रथयात्रा डिचोलीमार्गे थेट अस्नोडा येथे संध्याकाळी दाखल होणार आहे. तेथे भव्य स्वागत झाल्यानंतर अनेक भाविक शिरसईपर्यंत मंदिरात चालत जाणार आहेत. मंदिरात आज या रथाचा मुक्काम होणार असून तेथे विविध कार्यक्रम होणार आहेत.

सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हरवळे मंदिरात उपस्थित राहून अभिषेक केला. पिंडीवर जलाभिषेक, दुग्धाभिषेक केल्यानंतर या रथोत्सवाची माहिती देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर यांनी त्यांना दिली. यावेळी रितेश रवी नाईक व समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. देव श्री रूद्रेश्वर हे संपूर्ण गोव्याचे दैवत आहे.

Rudreshwar Rathotsav Goa 2025
Shri Rudreshwar Mandir: भंडारी समाजात प्रचंड असंतोष; ‘रुद्रेश्‍वर’प्रश्‍नी खदखद

महाशिवरात्री उत्सवानिमित्त संपूर्ण राज्यातून भाविक भक्तजन लाखोंच्या संख्येने या मंदिरास भेट देऊन सेवा रूजू करतात. आज गोव्याच्या विविध भागात उत्सव संपन्न होत असला तरी या मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झालेली नाही. या जागृत देवाच्या सेवेचे महात्म्य व महत्त्व वेगळेच आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगून आजपासून सुरू होत असलेल्या रथोत्सवाला शुभेच्छा व्यक्त केल्या.

रथोत्सव समितीचे अध्यक्ष मंत्री रवी नाईक, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक, जयेश साळगावकर, माजी आमदार किरण कांदोळकर, माजी सभापती नरहरी हळदणकर, श्याम सातार्डेकर, धर्मा चोडणकर, ॲड. अमित पालेकर व इतरांनी उपस्थित राहून सेवा रूजू केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com