EV kadamba: कदंबा होणार कॅशलेस? प्रवाशांच्या थंड प्रतिसादामुळे निर्णय तूर्तास मागे

EV Cashless Kadamba Goa: स्मार्ट ट्रान्झिट कार्डसाठी प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने स्मार्ट सिटी इव्ही बससेवा कॅशलेस करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
EV Cashless Kadamba Goa: स्मार्ट ट्रान्झिट कार्डसाठी  प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने स्मार्ट सिटी इव्ही बससेवा कॅशलेस करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
EV Cashless Kadamba GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील कदंबा परिवहनाच्या इलेकट्रीक बसेस येत्या दोन दिवसांत कॅशलेस होणार अशी बातमी समोर आली होती. कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी संबंधित माहिती दिली होती, मात्र आता पुन्हा एकदा उल्हास तुयेकर यांच्याकडून मिळालेल्या नवीन माहितीनुसार स्मार्ट ट्रान्झिट कार्डसाठी प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने स्मार्ट सिटी इव्ही बससेवा कॅशलेस करण्याचा निर्णय तूर्तास मागे घेण्यात आला आहे.

यापूर्वी कदंबाच्या एव्ही बसने प्रवास करायचा असल्यास स्मार्ट ट्रान्झिट कार्डचा वापर करावा लागेल अशी बातमी समोर आली होती.

EV Cashless Kadamba Goa: स्मार्ट ट्रान्झिट कार्डसाठी  प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने स्मार्ट सिटी इव्ही बससेवा कॅशलेस करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
Kadamba EV Bus Drivers: 'हे' चालकही गोमंतकीय आहेत! कदंब बसचालकांच्या पगारावरुन सरदेसाईंची खरमरीत टीका

काही प्रवाशांनी हे कार्ड आधीपासूनच केलेलं होतं तर काही जणांनी अद्याप कार्ड बनवणं बाकी होतं आणि म्हणून कदंबा महामंडळाकडून दोन दिवसांचा आणखीन अवधी देण्यात आला होता आणि यानंतर मात्र एव्ही कदंब पूर्णपणे कॅशलेस होणार होत्या.

कॅशलेस कदंबामध्ये कंडक्टर नाही?

उल्हास तुयेकर यांनी सांगितल्या प्रमाणे कॅशलेस कदंबामध्ये कार्डचा वापर करून तिकीट दिलं जाणार असल्याने या बसेसमध्ये कंडक्टर असणार नाही. प्रवाशांना या कार्डचा वापर समजावा म्हणून कदंबा महामंडळाने पुरेसा वेळ देऊ केला होता. कार्ड नेमकं कसं चालतं हे शिकवण्यासाठी महामंडळाकडून एका प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र तरीही या नवीन उपक्रमाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com