
Kadamba EV Bus कदंब परिवहन महामंडळाच्या ताफ्यात मंगळवारी दोन इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या. पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत या बसगाड्या मिळाल्या असून या दोन्ही बसगाड्या पणजी बसस्थानक ते गोवा विद्यापीठ मार्गे बांबोळी रुग्णालय अशी सेवा देणार आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे.
तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पणजीत आणखी काही इलेक्ट्रिक बसगाड्या धावणार आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत फक्त 32 इलेक्ट्रिक बसगाड्या मिळाल्या आहेत.या बसगाड्यांची वेळ आणि मार्ग लवकरच ठरवले जातील.
चार्जिंग स्टेशनचे कामही लवकरच सुरू होणार आहे. मडगाव, पर्वरी आणि इतर ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली आहेत. तसेच कदंब महामंडळाला सध्या 200 इलेक्ट्रिक बसगाड्यांचा तुटवडा भासत असल्याची माहितीही मिळाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.