गोमन्तक डिजिटल टीम
ऋतुमानानुसार सध्या हिवाळा सुरू असला तरी गोव्यात वातावरणाचा खेळ सुरु आहे.
फेंगलमुळे गोव्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.
यात भरीस भर म्हणूव वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत.
नुकतेच साखळी, वाळपई आसपासच्या परिसरात पावसाचा शिडकाव झाला.
राज्यात कमाल तापमानाचा पारा ३३ अंशांवर गेला आहे.
सध्या हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या विचित्र हवामानाला कंटाळलेले लोक थंडीची वाट पहात आहेत.