Cutbona Jetty: अस्वच्छतेमुळेच कॉलराचा उद्रेक! कुटबण, मोबोर येथे कोविड मार्गदर्शक नियम पाळण्याचे आदेश

Cutbona Jetty Inspection: कुटबण, मोबोर जेटींची उच्चस्तरीय समितीमार्फत पाहणी करण्यात आली. यावेळी तिथे अनेक गफलती असल्याचे आढळून आले
Cutbona Jetty Inspection: कुटबण, मोबोर जेटींची उच्चस्तरीय समितीमार्फत पाहणी करण्यात आली. यावेळी तिथे अनेक गफलती असल्याचे आढळून आले.
Cutbona Jetty|Restriction Canva
Published on
Updated on

सासष्टी: कुटबण, मोबोर मच्छीमार जेटीवर काम करणाऱ्या मजुरांना आरोग्याचा जो त्रास सोसावा लागत आहे, त्याला अनुसरून मत्स्य व्यवसाय खात्याने सर्व मच्छीमारांना तसेच बोट मालकांना कोविड काळातील मार्गदर्शक नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत. या जेटीवर कॉलेरामुळे अधिकृत आकड्याप्रमाणे पाच मजुरांचे निधन झाले आहेत. शेकडो मजूर इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत.

जेटीशी संबंधित सर्वांनी हे मार्गदर्शक नियम काटेकोरपणे पाळण्यास सांगितल्याचे संचालिका शर्मिला मोंतेरो यांनी स्पष्ट केले. आम्ही जे नियम पाळण्यास सांगितले आहेत, त्यात आरोग्य व स्वच्छता विषयक नियम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच तीन दिवसांच्या आत वापरात नसलेल्या बोटी व जाळी तिथून हटविण्याचे आदेश दिले आहेत. बोट मालकांनी किंवा संबंधितांनी बोटी किंवा जाळी हटविली नाहीत तर खात्यामार्फत त्याचा लिलाव केला जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

उपजिल्हाधिकाऱ्यांचे सक्त निर्देश

या पाहणीनंतर दक्षिण गोव्याचे उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांनी मत्स्य व्यवसाय खात्याला जेटीवरुन वापरात नसलेल्या बोटी हटविण्याचा आदेश दिला. मोबाईल शौचालये उपलब्ध करणे व जी बायो शौचालये बंद आहेत ती दुरुस्त करून वापरास खुली करणे असेही सांगण्यात आले. टॅंकरातून येत असलेल्या पाण्याची तपासणी करण्यास अन्न व औषध प्रशासनाला सांगण्यात आले आहे. बोटीवर काम करताना मजुरांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये, असेही सांगण्यात आले आहे.

Cutbona Jetty Inspection: कुटबण, मोबोर जेटींची उच्चस्तरीय समितीमार्फत पाहणी करण्यात आली. यावेळी तिथे अनेक गफलती असल्याचे आढळून आले.
Cutbona Jetty: कुटबण जेटीवरील सर्व मजुरांची तपासणी आवश्यक! जास्त मजूर मृत्युमुखी पडल्याची शक्यता

आरोग्य खातेही सक्रिय

कॉलेराची साथ पसरू नये म्हणून आरोग्य खाते दिवस रात्र झटत आहे. आरोग्य खात्याने बोट मालकांना ओआरएस (ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन) पॉकेट्स दिली आहेत. कचरा व्यवस्थापनात सुसूत्रता आणण्यास सांगितले आहे.

समितीमार्फत जेटींची पाहणी

शुक्रवारी कुटबण, मोबोर जेटींची उच्चस्तरीय समितीमार्फत पाहणी करण्यात आली. यावेळी तिथे अनेक गफलती असल्याचे आढळून आले. कॉलेराची साथ वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे तेथील अस्वच्छता असा निष्कर्ष काढण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa authorities enforce fishing restrictions at Cutbona Jetty
Goa Monsoon Preparedness
Cutbona Jetty Infrastructure Issues
Cutbona jetty sanitation issues Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com