Amit Shah's Meeting In Goa : भाजपच्या बालेकिल्ल्यात कार्यकर्ते एकवटले, सभेची जोरदार तयारी सुरु

कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु
BJP
BJPDainik Gomantak

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा हे रविवारी (ता.16) गोवा दौऱ्यावर येत आहेत. फर्मागुढी-फोंडा येथे जाहीर सभेत ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याने या सभेची सावर्डे मतदारसंघातूनही जोरदार तयारी सुरू आहे. या मतदारसंघातूनही जास्तीत जास्त कार्यकर्ते शहांच्या सभेला जाणार आहेत.

आमदार डॉ. गणेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावर्डे मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक कळसई येथील भक्तिधाम सभागृहात घेण्यात आली.

BJP
Anjuna Police: हणजुणेत वाहतूक पोलिसांनी घेतली लाच? व्हिडिओ व्हायरल...

या बैठकीत दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, भाजप गट मंडळ अध्यक्ष विलास देसाई, सचिव शिरीष देसाई, मच्छिंद्र देसाई, भाजप मोर्चाचे सरचिटणीस मोहन गावकर, भाजयुमोचे अध्यक्ष रूपेश देसाई, महिला मोर्चाच्या अध्यक्ष रीमा नाईक, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष कमलाकांत नाईक, किसान मोर्चाचे अध्यक्ष राघोबा गावकर, कुळे-शिगावचे सरपंच गोविंद शिगावकर, साकोर्डाचे सरपंच प्रिया खांडेपारकर, सावर्डेचे सरपंच चिन्मयी नाईक, मोलेचे सरपंच कपिल नाईक तसेच इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

BJP
Anjuna Police: हणजुणेत वाहतूक पोलिसांनी घेतली लाच? व्हिडिओ व्हायरल...

सावर्डे मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे. प्रत्येक लोकसभा व राज्यातील निवडणुकीत येथील मतदारांनी भाजपच्या बाजूने सदैव कौल दिलेला आहे. सरकारच्या आशीर्वादाने या मतदारसंघात विकासही होत आहे.

तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत घरोघरी प्रचार व प्रसार करून जास्तीत जास्त मते भाजपच्या पदरात पाडून गोव्यात पूर्वीसारखाच हा मतदारसंघ उच्च ठेवावा.

- डॉ. गणेश गावकर, आमदार, सावर्डे मतदारसंघ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com