मुंबई: रेल्वे मंडळाने मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या नव्या मार्गावरील नव्या एक्सप्रेस ट्रेनला हिरवा कंदील दाखवला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे, बोरिवलीवरुन नवी सिंधू एक्सप्रेस मडगावपर्यंत धावणार आहे. सिंधू एक्सप्रेसला उद्या म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी वांद्रे ऐवजी बोरिवली रेल्वे स्थानकावरुन हिरवा बावटा दाखवला जाईल, अशी माहिती रेल्वे मंडळाने दिली आहे.
वांद्रे-मडगाव सिंधू एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस धावेल. काही दिवसांपासून एक्सप्रेस सुरु करण्याबाबत हालचली सुरु होत्या. अखेर ट्रेनला मान्यता मिळाली असून, त्याला २९ ऑगस्टपासून शुभारंभ होत आहे.
गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नव्या ट्रेनचा फायदा होणार आहे. दरम्यान, सिंधू एक्सप्रेसचे वेळापत्रक, मार्ग आणि थांबे याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे.
१) वांद्रे टर्मिनस - मडगाव ( बुधवार आणि शुक्रवार)
गाडी क्रमांक - १०११५
वांद्रे टर्मिनस वरुन सकाळी ६.६० वाजता सुटणार
मडगाव स्थानकावर रात्री दहा वाजता पोहोचणार
२) मडगाव - वांद्रे टर्मिनस ( मंगळवार आणि गुरुवार)
गाडी क्रमांक - १०११६
मडगाव स्थानकावरुन सकाळी ७.४० वाजता सुटणार
वांद्रे टर्मिनसवर रात्री ११.४० वाजता पोहोचणार
थांबा: वांद्रे , बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिवी, करमळी आणि मडगाव
एकूण डबे: या गाडीला एकूण 20 LHB (Linke Hofmann Busch) स्वरुपाचे डबे असणार आहेत. प्रवाशांची सुरक्षा, आराम याचा विचार करुन हे डब्बे तयार करण्यात आले आहेत.
शुभारंभाची ट्रेन वांद्रे ऐवजी बोरिवली येथून धावणार आहे. गाडी क्रमांक 09167 साठी आज (२८ ऑगस्ट) दुपारपासून बुकिंग सुरु झाले आहे. प्रवाशांना IRCTC च्या संकेतस्थळावरून बुकिंग करता येईल. या प्रवासासाठी ४०० ते ५०० रुपयपर्यंत पैसे प्रवाशांना मोजावे लागतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.