
पेडणे: कोकण रेल्वेतर्फे विविध पदांसाठी संगणकाद्वारे होणारी निवड चाचणी परीक्षा ही पारदर्शक असावी तसेच या संगणक नोकऱ्यांसाठी कोकण रेल्वे मार्गासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांसाठी प्राधान्य देण्यात यावे, असे कोकण रेल्वे मार्गासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
१३ ते १६ जानेवारीपर्यंत कोकण रेल्वेच्या १९० जागांसाठी संगणकावर निवड चाचणी घेण्यात येणार आहे. त्यात इलेक्ट्रिकल अभियंते, सिव्हिल अभियंते, स्टेशन मास्तर, गुड्स ट्रेन मॅनेजर, सिग्नलधारक, पर्यवेक्षक आदी जागांचा समावेश आहे.
१९ जुलै १९९० मध्ये कोकण रेल्वेच्या मार्गासाठीची पायाभरणी झाली व २६ जानेवारी १९९८ मध्ये कोकण रेल्वे मार्ग कार्यान्वित झाला. कायद्यानुसार रेल्वे मार्गासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकऱ्यांत प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. रोहा (महाराष्ट्र) ते ठकुर (कर्नाटक) पर्यंत कोकण रेल्वेस जमीन गेलेले ३६,७०० भूपीडित आहेत. मात्र, सुमारे ३,०९४ भूपीडित लोकांनाच नोकऱ्या मिळाल्या आहेत.
२०१९ मध्ये कोकण रेल्वेत विविध पदांसाठी झालेल्या जागा ‘लँड लूजर’ना डावलून सोलापूर व पुणे डिव्हिजनच्या उमेदवारांची कोकण रेल्वे स्टेशन मास्टरच्या पदांसाठी निवड केली गेली होती व याची मंत्री वेणू नायर यांनी २०२१ मध्ये रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना कबुली दिली होती.
त्याचा व्हिडिओही सगळीकडे वायरल झाला होता. वेणू नायर हे सध्या कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मजदूर युनियन संघटनेचे महामंत्री आहेत.
ऑक्टोबर २०२४ मध्ये कंत्राटी पद्धतीने अभियंते व मॅकेनिकांच्या मुलाखती बेलापूर येथे झाल्या होत्या. त्यावेळीही लँड लूझरना डावलून उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल व अशाच अन्य राज्यांतील उमेदवारांना नोकऱ्या देण्यात आल्या. कोकण रेल्वेच्या वेर्णे व मडगाव डेपोत असे अनेक निवड झालेले उमेदवार आहेत. त्यातील बऱ्याच उमेदवारांना इंग्रजी लिहिता व वाचता येत नाही. याचा परिणाम म्हणून दुरुस्तीच्या कामात बरीच दिरंगाई होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.