Goa: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल हैदराबाद येथून आलेल्या पहिल्या विमानातील प्रवाशांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हैदराबादला जाणाऱ्या पहिल्या प्रवाशाला बोर्डिंग पास दिला.
तसेच उड्डाण संचालनालयाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते.
या सोहळ्यात केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग ऑनलाईन पद्धतीने दिल्लीतून सहभागी झाले होते. सकाळी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हैदराबाद येथून गोव्याला येणाऱ्या विमानाला हिरवा कंदील दाखवला.
विमानतळावरील उड्डाण संचालनालयाची ही गोव्याच्या विकासाच्या एका नव्या अध्यायाची सुरवात आहे. या विमानतळाद्वारे जीजीआयएएल प्रवासी, विमान कंपन्या आणि सर्व भागधारकांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्याच्या दिशेने सतत काम करेल. जगाला सर्वोत्कृष्ट सुविधा पुरवण्याचे आमचे ध्येय आहे. - आर. व्ही. शेषन, सीईओ-जीजीआयएएल.
विमानतळ सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पेडणे टॅक्सी संघटनेने बंद पुकारत बहिष्कार टाकल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. गोवा टॅक्सी ॲप, गोवा माईल्स आणि एका खासगी टॅक्सी सेवेला बोलावले होते.
तरीही तिसरे विमान आल्यानंतर प्रवाशांचा खोळंबा झाला. ही बाब लक्षात येताच जीएमआर कंपनीने स्वतःची टॅक्सी सुरू करत प्रवाशांना मोफत त्यांच्या इच्छितस्थळी सोडले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.