गोमंतकीयांसाठी अतिशय महत्वाची बातमी! शनिवारी सकाळी सहापासून 24 तास राज्यातील OPD राहणार बंद
OPD ServiceDainik Gomantak

गोमंतकीयांसाठी अतिशय महत्वाची बातमी! शनिवारी सकाळी सहापासून 24 तास राज्यातील OPD राहणार बंद

Goa News: कोलकाता येथे शासकीय रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरची लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली याप्रकरणी IMA ने देशव्यापी संप घोषित केला आहे.
Published on

पणजी: गोव्यातील नागरिकांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय वैद्यक संघटनेच्या (IMA) वतीने शनिवारी होणाऱ्या देशव्यापी संपात गोवा शाखा सहभागी होणार आहे.

यापार्श्वभूमीवर राज्यातील आपत्कालीन सेवा वगळता शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून पुढचे चोवीस तास ओपीडी सेवा बंद राहणार आहे. आयएमए, गोवा शाखेच्या वतीने याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

कोलकाता येथील शासकीय आर जी कर रुग्णालयात गेल्या शुक्रवारी (9 ऑगस्ट) एका शिकाऊ डॉक्टरची लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. याघटनेनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत असून, वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत नागरिकांकडून आंदोलन केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर शनिवारी आयएमएच्या वतीने देशव्यापी संप केला जाणार आहे. यात गोवा शाखा देखील सहभागी होणार आहे.

शनिवारी (१७ ऑगस्ट) सकाळी सहा ते रविवारी (१८ ऑगस्ट) सकाळी सहा वाजेपर्यंत गोव्यात आपत्कालीन सेवा वगळता ओपीडी सेवा बंद राहतील. राज्यातील आएमएच्या सदस्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

IMA Press Note
IMA Press NoteDainik Gomantak
गोमंतकीयांसाठी अतिशय महत्वाची बातमी! शनिवारी सकाळी सहापासून 24 तास राज्यातील OPD राहणार बंद
अमली पदार्थ सर्वत्र! गोवा सरकारच्या पर्यावरण मंत्र्याचे वादग्रस्त विधान, आपच्या आमदाराने घेतली शाळा

कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टर तसेच एका महिलेविरोधात केलेल्या क्रूर अत्याचाराचा आएमएकडून निषेध करण्यात आला आहे.

IMA च्या मागण्या

१) पीडितेच्या कुटुंबियाना आर्थिक मदत देऊन, दोषींना अटक करावी व प्रकरण फास्टट्रॅक करावे.

२) डॉक्टरांसोबत होणाऱ्या हिंसक घटनांविरोधात सक्त कायदेशीर तरदूत करावी.

३) रुग्णालयांना सुरक्षित क्षेत्र घोषित करुन सुरक्षा प्रदान करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com