Kolkata Doctor Case: ''...ममता बॅनर्जी यांनी हालगर्जीपणा दाखवला''; मुख्यमंत्री सावंत बरसले
Goa CM Pramod SawantDainik Gomantak

Kolkata Doctor Case: ''...ममता बॅनर्जी यांनी हालगर्जीपणा दाखवला''; मुख्यमंत्री सावंत बरसले

Goa CM Dr Pramod Sawant: कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील लेडी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे गोव्यातही पडसाद उमटतायेत.
Published on

कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील लेडी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे गोव्यातही पडसाद उमटतायेत. याच पार्श्वभूमी आता गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अशा संवेदनशील प्रकरणात हालगर्जीपणा दाखवल्याबद्दल मुख्यमंत्री सावंत यांनी चांगलाच समाचार घेतला.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, ''कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचारप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत: एका महिला असून हालगर्जीपणा दाखवल्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो.'' इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी मुख्यमंत्री सावंत यांची आज ( 17 ऑगस्ट) भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्यांनी डॉक्टरांच्या सुरक्षिततेविषयी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी चर्चा केली.

Kolkata Doctor Case: ''...ममता बॅनर्जी यांनी हालगर्जीपणा दाखवला''; मुख्यमंत्री सावंत बरसले
Kolkata Doctor Rape Murder Case: राज्यात दोन दिवस ‘ओपीडी’ बंद! कोलकाता प्रकरणाचा तीव्र निषेध

दरम्यान, डॉक्टर, परिचारिका यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी गोवा वैद्यकीय कायद्यात दुरुस्ती, जिल्हा कृती दलांची लवकरात लवकर स्थापना करण्यासह रुग्णालयांना सुरक्षित ठिकाणे म्हणून जाहीर करण्याची मागणी आज (17 ऑगस्ट) आंदोलक विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता आंदोलकांनी कोलकाता येथील महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करुन हत्या करणाऱ्या नराधमाला कडक शिक्षा देण्याचीही मागणी केली.

Kolkata Doctor Case: ''...ममता बॅनर्जी यांनी हालगर्जीपणा दाखवला''; मुख्यमंत्री सावंत बरसले
Kolkata Doctor Case: कोलकाता लैंगिक अत्याचार आणि हत्याप्रकरणाचे गोव्यातही पडसाद; जीएमसीत विद्यार्थी आणि डॉक्टरांकडून आंदोलनाची हाक!

चोडणकर पुढे म्हणाले की, 'गोव्यातील वैद्यकीय कायदा केवळ नावालाच आहे. त्याची योग्यरित्या अंमलबजावणी होत नाहीये. सावंत सरकारने गोव्यातील या वैद्यकीय कायद्यात आता तात्काळ दुरुस्ती करुन डॉक्टर्स आणि परिचारिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पाऊल उचलावे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com