
वास्को: तब्बल चाळीस कोटींची खोटी बिले सादर करून ८ कोटी ५० लाखांचा जीएसटी घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोल्हापूर केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने गोव्यातील व्यापारी आर्थिक ललित कुमार जैन (२९, रा. वास्को) यास शुक्रवारी अटक केली. पथकाने त्याची सलग सोळा तास चौकशी केली. न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. संशयिताची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
कोल्हापूर येथील केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभागाचे अधिकारी सुरज पवार, अभिजित भिसे, सौरभ पवार, अविनाश सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. १८ ऑक्टोबर रोजी पथकाने गोव्यातील मे. आर्थिक ललितकुमार जैन व मे. ललिता ललित कुमार जैन या फर्मच्या कार्यालय व घरावर छापा टाकला होता.
अधिकाऱ्यांनी संशयित जैन यांच्या वापरातील मोबाईलसह अन्य महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. जप्त मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीदरम्यान जैन यांनी केलेल्या व्यवहारात संशयास्पद नोंदी आढळून आल्या. या अनुषंगाने केलेल्या तपासणीत सुमारे ५० कोटींची खोटी बिले सादर केल्याचे निदर्शनास आले.
जैन याने आईच्या नावे असलेल्या गोव्यातील दुसऱ्या फर्मवरही कर चोरीचा प्रकार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. गुप्तचर विभागाने याप्रकरणी संशयित जैन यास अटक करून त्याच्याकडे चौकशी केली. शुक्रवारी दुपारी त्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर करण्यात आले असता १४ दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
कोल्हापूर येथील केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने गोवा येथे छापा टाकून केलेल्या कारवाईमुळे गोव्यातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मे. आर्थिक ललितकुमार जैन व मे. ललिता ललित कुमार जैन यांचे नवेवाडे वास्को येथे हार्डवेअर दुकान असून या दुकानात दुय्यम स्वरूपाचा माल विकला जात असल्याच्या तक्रारीही आहे. जैन यांच्यावरील केलेल्या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे. तसेच इतर बेकायदा व्यवसायांवरही कारवाई व्हावी अशी मागणी लोकांकडून होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.