

रत्नागिरी: फळांचा राजा आणि कोकणातच नव्हे तर जगभरात ज्याच्या अविट गोडीची चर्चा आहे त्या हापूसच्या मानांकनावरून आता वाद सुरू झाला आहे. ‘कोकण हापूस’वर गुजरातने दावा केला आहे.
‘गुजरात-वलसाड हापूस’ म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी करण्यात आली आहे; परंतु २०१८ मध्येच ‘कोकण हापूस’ला कायदेशीर मानांकन मिळालेले आहे. यासाठी गेली दहा वर्षे प्रयत्न सुरू होते. आता ‘कोकण हापूस’ मानांकन अन्य कोणी वापरणे गैर आहे.
हे मानांकन संरक्षित ठेवण्यासाठी वेळप्रसंगी कायदेशीर लढाई लढू, असा इशारा कोकण हापूस उत्पादक व विक्रेते संघाकडून देण्यात आला आहे. जगात प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलियातील खवय्यांना कोकण हापूसची गोडी लागली आहे; पण, याच ‘कोकण हापूस’वर ‘गुजरात- वलसाड हापूस’ म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.
जगात ‘कोकण हापूस’, हे ‘हापूस आंब्याला’ मिळालेले पहिले आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे. आंब्याच्या हंगामात आणि खरेदी-विक्रीत हापूसचा बोलबाला जास्त असल्यामुळे प्रत्येकाला हापूस मानांकन हवे आहे. कोकण हापूसला मानांकन मिळाल्यानंतर पहिल्यांदा ‘शिवनेरी हापूस’ आंबा नावाने २०२२ मध्ये भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने अर्ज केला आहे.
गुजरातच्या ‘वलसाड’ नावाच्या आंब्यामुळे देवगड किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला पडणार नाही. शेवटी आमची मधुर चव तशीच राहणार आहे. ‘वलसाड’ येऊ दे किंवा कर्नाटक येऊ दे ‘रत्नागिरी’ हापूसला कोणी बाजूला करू शकत नाही. यावर गुजराती आक्रमणाचा काही संबंधच नाही.
उदय सामंत, उद्योगमंत्री
‘कोकण हापूस’ला २०१८ ला एआय मानांकन मिळाले. आंब्यांचा राजा हापूसची ही कायदेशीर प्रक्रिया होऊन मानांकन मिळाले आहे. इतर प्रदेशात आलेल्या किंवा इतर राज्यातील लोकांना हापूस हे कायदेशीर नाव वापरणे आता गैर आहे. आपल्या हापूस आंब्याची असंख्य लागवड मलावी देशात करण्यात आली. २०१५-१६ मध्ये ‘मलावी हापूस’ म्हणून आपल्याकडे आंबा येत होता; परंतु २०१८ ला जसे आपल्याला मानांकन मिळाले. त्यानंतर त्यांनी २०१९ पासून ‘मालावी मॅंगोज’ नावाने आंब्याची विक्री केली. हे संरक्षण आम्हाला अबाधित हवे. आमचा हापूस आमच्यासाठी राखीव आहे. आमचे नाव आमच्यासाठी सुरक्षित राहावे, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे.
डॉ. विवेक भिडे, अध्यक्ष, कोकण हापूस उत्पादक व विक्रेते संघ
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.