पणजी: इस्त्रायलच्या मुंबईतील दूतावासाचे कौन्सुल जनरल कोबी शोश्नी (Kobbi Shoshani) यांनी गुरुवारी ‘गोमन्तक’ कार्यालयाला भेट देऊन संपादक संचालक राजू नायक यांच्याशी गोव्याच्या निवडणुकांवर (Goa Election 2022) चर्चा केली. शोश्नी यांना गोवा आवडतो आणि यापूर्वी ते सपत्नीक खासगी दौऱ्यावर येऊन गेले आहेत.
कोबी शोश्नी यांनी आपल्याला राजकारण आवडते आणि गोव्याची राजकीय (Goa Politics) परिस्थिती समजून घेण्यासाठी आपला हा दौरा होता. या दौऱ्यात आपण राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच प्रसारमाध्यमांशी चर्चा केल्याची त्यांनी माहिती दिली. यावेळी सकाळ समूहाचे सीईओ उदय जाधव उपस्थित होते.
यंग इन्स्पिरेटर्सचे काम चांगले : गोमन्तक आणि सकाळ माध्यमांचे व्यासपीठ असलेले यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क चांगल्या प्रकारे काम करीत असून, भारत - इस्त्रायल संबंधातून गोव्यात येणाऱ्या तज्ज्ञांचा वार्तालाप राज्यातील युवकांसाठी आयोजित केला जाऊ शकतो, हा प्रस्ताव त्यांनी उचलून धरला. इस्त्रायली दुतावासाचे राजकीय विश्लेशक अनय जोगळेकर उपस्थित होते.
गोव्यातील वर्तमानपत्रे राजकारणाला खूप जागा देतात. त्याचप्रमाणे येथील जनतेमधील राजकारणाबद्दल उत्सुकता असते आणि निवडणुकीत लोक जादा वर्तमानपत्रे वाचतात. हे वाचून त्यांना आश्चर्य वाटले. इस्त्रायलच्या नागरिकांना गोव्याबद्दल खूप आकर्षण आहे. तेलअविव ते दाबोळी दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी चर्चा सुरू होती. परंतु कोविडमुळे ही योजना पुढे गेली आहे. कोविडच्या काळात इस्त्रायील नागरिकांचा प्रवास थांबला असला तरी या महामारीच्या काळात लोकांची अभिरूची आणि पसंती बदलली आहे. तरीही लोक गोव्यात यायला उत्सुक असतात. ‘काही कारणांमुळे इस्त्रायलचे एक विमान गोव्यात थोड्या काळासाठी उतरावे लागले होते. त्यावेळी प्रवाशांनी गोव्यात उतरण्याची परवानगी मागितली होती. एवढे हे लोक गोव्यात यायला उत्सुक असतात, अशी माहिती त्यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.