Goa Congress: लोकभावनेशी खेळू नका; एकतर कॅसिनो हटवा किंवा परशुरामाचा पुतळा!

बर्डेंची मागणी : पुतळ्याबाबत जनभावनेची कदर करा
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress गोवा ही परशुरामाची भूमी समजली जाते. पणजीत मांडवी किनारी कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेल्या ठिकाणी परशुरामाचा पुतळा उभारण्यात आला आहे. या परशुरामाच्या पुतळ्यासमोर मांडवीतील कॅसिनो आहेत.

येथील जनता परशुरामाला मानते, त्यामुळे एकतर जनभावना ओळखून भाजप सरकारने येथील कॅसिनो हटवावेत आणि ते शक्य नसल्यास हा पुतळा तरी तेथून हटवावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते संजय बर्डे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

Goa Congress
Goa Mine: 'पोटासाठी बँकेत सोनं गहाण ठेवलं, ते सोडवण्यासाठीही पैसे नाही', खाणबंदीचा फटका बसलेल्या ट्रकचालकांची व्यथा

बर्डे म्हणाले, गुजरातमध्ये भाजप सरकारने तीन हजार कोटी रुपये खर्च करून सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला आहे. राज्य सरकारने अशा प्रकारचाच पुतळा येथे उभारणे आवश्‍यक होते.

नको त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. गोव्यातील जनतेकडे तरी पुतळ्यासाठी पैसे मागायला हवे होते, त्यांनी त्यासाठी मदत केली असती.

ज्या ठिकाणी पुतळा उभारला गेला आहे, त्या ठिकाणी एका बाजूला हिरवाईने एकेकाळी नटलेला डोंगर आता दिसत नाही, तर त्या ठिकाणी इमारती बांधल्या जात आहेत. तर पुतळ्यासमोर असणाऱ्या मांडवी नदीत कॅसिनो उभे आहेत, हे न पटणारे आहे.

Goa Congress
Sao Joao Festival: बाणावलीतील वेस्टर्न बायपासचा 'सांजाव'मधून निषेध; ग्रामस्थ म्हणतात, ... अन्यथा बाणावली बुडणे अटळ

सरकारने जी मूर्ती उभी केली आहे, त्या मूर्तीला तडे गेलेले आहेत. सरकारने लोकभावनेशी खेळू नये. एकतर तत्काळ परशुरामाची मूर्ती तेथून हटवावी, नाहीतर कॅसिनो हटवावेत, ही मागणी आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करीत आहोत.

- संजय बर्डे, कॉंग्रेसचे नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com