गुडघ्यावर बसून सभापतींना हात जोडले, विरोधक हौदात मांडीच घालून बसले; राणेंच्या TCP खात्यावरुन विधानसभेत हाय व्होलटेज ड्रामा

Goa Assembly Monsoon Session 2025: विरोधक माघार न घेता मागणीवर ठाम राहिले. अखेर सभापतींना सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.
Goa legislative assembly drama| Goa Assembly Monsoon Session 2025
High voltage drama in Goa assembly over RaneDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी: नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी न्यायप्रविष्ट असलेल्या प्रश्नावर उत्तर देण्यास नकार दिल्याने पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. विरोधी पक्षातील आमदारांनी सभापतींच्या हौदात प्रवेश करत जोरदार निदर्शन केले एवढेच नव्हे तर सभापतींसमो गुडघ्यावर बसून हात जोडले. अखेर सभापतींनी कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केल्यानंतर विरोधी आमदार हौदात मांडी घालून खाली बसले.

प्रश्नोत्तराचा तास सुरु होण्यापूर्वी नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी जमीन रुपांतर आणि कलम ३९ए अंतर्गत उपस्थित केलेले प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांची उत्तरे देण्यास नकार दिला. यावरुन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी आक्रमक होत, उत्तर कसे नाकारले जाऊ शकते? असा सवाल उपस्थित करत गोंधळ घातला. यात आपच्या दोन आमदारांनी देखील आवाज मिसळला.

Goa legislative assembly drama| Goa Assembly Monsoon Session 2025
Goa Assembly Session: 'मराठी'वरुन गोवा विधानसभेत गोंधळ; 'मगो'च्या आमदाराने राजभाषा दर्जाची मागणी करताच युरी, सरदेसाई आक्रमक

विरोधी पक्षातील आमदार वीरेश बोरकर, व्हेंझी व्हिएगस, क्रूझ सिल्वा, आल्टन डिकॉस्टा, युरी आलेमाव सभापतींच्या हौदात जात जोरदार आवाज उठवला. वीरेश बोरकरांनी मी हात जोडतो, असे म्हणत सभापतींना विनवणी केली. यानंतर बोरकर, आलेमाव यांच्यासह सर्वजण थेट गुडघ्यावर बसून सभापतींना विनंती करु लागले. या दरम्यान, सभातींना हा विषय सरकारचा असल्याचे सांगत विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. 

Goa legislative assembly drama| Goa Assembly Monsoon Session 2025
Goa Politics: खरी कुजबुज; शपथविधीसाठी शिवलेले सूट पडून

दरम्यान, विरोधक माघार न घेता मागणीवर ठाम राहिले. अखेर सभापतींना सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज तहकूब केल्यानंतर विरोधी आमदारांना मांडी घालून हौदातच ठाण मांडले. दहा मिनिटांनी कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर देखील विरोधक तिथेच थांबले होते. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर चर्चा करण्याची हमी सभापती रमेश तवडकर यांनी दिल्यानंतर विरोधकांनी माघार घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com