Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्प; मुदतवाढीसाठी सरकारचा अर्ज

अर्जावरील सुनावणी २३ ऑक्टोबरला सुनावणीस येण्याची शक्यता
Goa Tiger Reserve
Goa Tiger ReserveDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेली मुदत २४ ऑक्टोबरला संपत असल्याने ती वाढवण्यासाठी शुक्रवारी सरकारतर्फे अर्ज सादर करण्यात आला. या अर्जावरील सुनावणी सोमवारी (२३ ऑक्टोबर) सुनावणीस येण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेल्या विशेष याचिकेवरील सुनावणी १० नोव्हेंबरला ठेवल्याने तोपर्यंत ही मुदतवाढ द्यावी, अशी विनंती अर्जात केली आहे.

यासंदर्भात ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम म्हणाले की, हा प्रकल्प घोषित करण्याच्या निवाड्याला सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Goa Tiger Reserve
Marina Project: नावशी मरिना प्रकल्पाविषयी विरोधकांनी भूमिका मांडावी : मुख्यमंत्री सावंत

...तर अवमान याचिका दाखल

याप्रकरणी सुनावणी १० नोव्हेंबरला ठेवली आहे. तोपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी विनंती केली जाणार आहे. या अर्जावरील सुनावणीवेळी न्यायालय काय निर्णय देते, यावर सरकारची पुढील भूमिका ठरेल.

दुसऱ्या बाजूने मुदत टळून गेल्यानंतर अवमान याचिका सादर करण्याची तयारी गोवा फाऊंडेशनने ठेवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa HC rejects ECI stay request
Goa High Court SIR hearing
Luthra Brothers Bail Hearing
Mhadei Water Dispute Thrilling Update
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com