Goa News: खोर्ली-उसपकर जंक्शनवर नाल्याचे काम सुरू

खोर्ली-म्हापसा येथील उसपकर जंक्शनवरील नाल्याचे काम साबांखाकडून हाती घेतले असून सदर मार्ग हा वाहतुकीसाठी सध्या तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
Goa News |
Goa News |Dainik Gomantak

Goa News: खोर्ली-म्हापसा येथील उसपकर जंक्शनवरील नाल्याचे काम साबांखाकडून हाती घेतले असून सदर मार्ग हा वाहतुकीसाठी सध्या तात्पुरता बंद करण्यात आला आहे. साबांखाने 45 दिवसांसाठी येथील वाहतूक वळविण्यासाठी परवानगी घेतली आहे.

या कामासाठी 90 लाख रुपये खर्च अपेक्षित असून शनिवारी उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी या नाल्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक स्वप्नील शिरोडकर व भाजपा म्हापसा मंडळाचे सरचिटणीस योगेश खेडेकर हे उपस्थित होते.

Goa News |
National Sports: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमुळे क्रीडा पर्यटनाला वाव -डॉ. प्रमोद सावंत

डिसोझा म्हणाले, उसपकर जंक्शनवरील महत्त्वाचे असलेल्या या कल्व्हर्टचे काम हाती घेतले असून या मार्गावरील वाहतूक काणका बायपास तसेच सातेरी मंदिराकडून वळविली आहे. हा रस्ता आसगाव, हणजूणच्या दिशेने जातो. या कामासाठी तीन महिन्यांचा अवधी लागू शकतो.

सध्या फेस्टिव्ह सिझन संपला आहे. याशिवाय म्हापसा वाहतूक पोलिसांनी काम हाती घेण्यास हिरवा कंदिल दिल्यानंतर हे काम हाती घेतले. पावसाळ्यात मोठा पाऊस पडल्यास उसपकर जंक्शनवरील हा नाला तुंबून येथे पाणी साचण्याचे प्रकार आम्ही पाहिलेत.

मात्र हे काम पूर्णत्वास आल्यानंतर खोर्ली तसेच मार्गावरील लोकांना हा सुटकेचा उसासा ठरेल. त्यामुळे खोर्लीवासीयांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कामासंदर्भात प्रतिक्रिया देताना संजय बर्डे म्हणाले, हा वर्दळीचा रस्ता असताना स्थानिकांना विश्वासात न घेताच हे काम सुरु केले.

आमचा विकासकामांना विरोध नाही, परंतु उत्सवानंतर हे काम सुरु करण्याची गरज होती. गणेश जयंती उत्सवावेळी प्रशासनाने वाहतुकीची इतरत्र बाजूने व्यवस्था करावी. कारण त्यादिवशी हा रस्ता वाहतुकीस बंद केला जातो.

Goa News |
Exam Warriors: साखळीमध्ये ''एक्झाम वॉरीयर्स चित्रकला स्पर्धा'' उत्साहात

पालखी कशी न्यायची?

खोर्ली सार्वजनिक गणेश विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग वराडकर म्हणाले, येत्या 25 जानेवारीला खोर्ली येथील गणपती मंदिरात श्रीगणेश जयंतीनिमित्त उत्सव आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात, तसेच महाप्रसाद असतो, असे असताना प्रशासनाकडून याठिकाणी नाल्याचे काम हाती घेतले.

आम्ही सदर काम हे उत्सवानंतर हाती घ्यावे, असे कळविले होते. मात्र आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. या प्रकारामुळे पालखी या रस्त्यावरून कशी न्यायची? हा प्रश्न उपस्थित होतो. चार दिवस कामास विलंब झाला असता काहीच बिघडले नसते.

असे भाविकांचे मत आहे. याबाबत संबंधितांशी चर्चा केली असती तर त्यावर तोडगा काढता आला असता, असेही मत स्थानिकांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com