Khandola News : एकाग्रतेने अभ्यास केल्यास यशप्राप्ती : मंत्री गोविंद गावडे

Khandola News : प्रियोळ प्रगती मंचतर्फे गुणवंतांचा गौरव
Khandola
KhandolaDainik Gomantak

Khandola News :

खांडोळा, यश प्राप्तीसाठी प्रथम आपले उद्दिष्ट निश्चित करावे. उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ते सफल करण्यासाठी नियोजनबद्धरीत्या आखणी करावी. तसेच मनावर ताबा ठेवून, एकाग्रतेने अभ्यास केल्यास यशप्राप्ती निश्‍चितपणे होते, असे उद्‌गार कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.

प्रियोळ प्रगती मंचाने आयोजित केलेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. बाणास्तारी मार्केट सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला. त्यांच्यासोबत भोम- अडकोणचे सरपंच दामोदर नाईक, तिवरे वरगावचे सरपंच जयेश नाईक, वेलिंग प्रियोळच्या सरपंच हर्षा गावडे,

सावईवेरेच्या सरपंच शोभा पेरणी, वळवईचे सरपंच विनायक वेंगुर्लेकर, सावईवेरे सरकारी हायस्कूलचे मुख्याध्यापक आंगडी, वागळे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मिथाशा ऐगल व अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमात दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मंत्री गावडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Khandola
Goa Today's Live News: गुरांच्या तस्करीचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला, दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

वेळ वाया घालवू नका

विद्यार्थ्‍यांनी आई- वडीलप्रमाणेच गुरु व वडीलधाऱ्यांशी चांगले आपुलकीचे नाते निर्माण करावे. त्यांच्या आज्ञांचे पालन करून योग्य पद्धतीने, नेमकेपणाने अभ्यास करा, असे आवाहन मंत्री गावडे यांनी यावेळी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com