Khandola News : माशेल अर्बनतर्फे विद्यार्थ्यांसाठी खास योजना

Khandola News : शाळांना ग्रंथालय साहित्य भेट, भागधारकांसाठी सोने खरेदी योजना
Khandola
Khandola Dainik Gomantak
Published on
Updated on

Khandola News :

खांडोळा, माशेल अर्बन को-ऑपरेटीव्ह सोसायटीतर्फे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खास अर्थसाह्य योजना सुरू केली असून शाळांतून वाचन साधना व्हावी, मुलांनी पुस्तके वाचावी, यासाठी शाळांना ग्रंथालय साहित्य भेट देण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष विनायक नार्वेकर यांनी दिली.

व्यासपीठावर संचालक मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश टी नाईक, विकास भगत, बाबी चोडणकर, पुरूषोत्तम फडते, सतीश नाईक, अर्जुन नाईक, शांताराम वरगांवकर, सीताराम गावडे, संचालक सचिव हिराकांत नाईक उपस्थित होते.

नार्वेकर पुढ म्हणाले, ''सुवर्ण गोल्ड लोन'' या कर्ज योजनेअंतर्गत ग्राहकांना सोसायटी मान्यताप्राप्त सुवर्णलंकाराकडून हॉलमार्क गोल्ड खरेदी करण्याची मुभा मिळणार आहे. अशा प्रकारची योजना राबविणारी गोव्यातील पहिली संस्था आहे. सोसायटीतर्फे विद्यार्थी दत्तक योजना राबवित असून त्याचा आढावा सोसायटी घेत आहे.

शिवाय सोसायटीतर्फे १५ शाळांसाठी लोखंडी कपाटे, पुस्तके प्रदान करण्यात आली असून ही योजना अधिक सक्षमपणे राबविण्यात येणार आहे.

यंदापासून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कर्ज देणार आहे. दरवर्षी सोसायटी सभासदांच्या दहावी, बारावी, पदवीधर अशा गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव करीत असते. दहावीच्या परीक्षेत ७० टक्क्याहून व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ६५ टक्के, पदवीधर ६० टक्के, आणि पदव्युत्तर ६० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे.

Khandola
Goa Monsoon 2024: पुढील 24 तास गोव्यात मुसळधार, रविवारी 'रेड अलर्ट'चा इशारा

पंधरा वर्षे ‘ए’ ग्रेड!

सोसायटीला गेल्यावर्षी एकूण १ कोटी ३४ लाख रुपये नफा झालेला आहे. शिवाय ३६.६२ लाख आयकर खात्याकडून मिळाले आहे. एकूण नफा १ कोटी ७२ लाख रुपये एवढे झाला आहे. सोसायटीला गेली १५ वर्षे ए ग्रेड ऑडीट प्राप्त झालेले आहे.

यावर्षी सोसायटीचे एकूण भागभांडवल ६४.०२ कोटी झाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ८.८६ कोटी वाढ झाली आहे. सोसायटीचे ३.३३ कोटी जमा आहेत, असे आवाहन अॅड. विनायक नार्वेकर यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com