Ganesh Chaturthi 2023: ढवळी येथे यंदा प्रथमच चतुर्थी बाजाराचे आयोजन

Ganesh Chaturthi 2023: दर्जेदार वस्तू उपलब्ध : ढवळी-फोंडा येथे विक्रेत्‍यांकडून उदंड प्रतिसाद
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023Dainik Gomantak

Ganesh Chaturthi 2023: ढवळी येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा प्रथमच चतुर्थी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. एरवी दीपावलीला हा बाजार भरवण्यात येतो, पण यावेळेला चतुर्थीला बाजार भरवण्याचे मंडळाने ठरवले आणि त्याला विक्रेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बाजाराचे उद्‌घाटन आज गुरुवारी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Ganesh Chaturthi 2023
Cause Of Rabies : सावधान! कुत्र्याने शरीराच्या या ठिकाणी चाटल्यास होऊ शकतो रेबीज

यावेळी कवळे सरपंच मनुजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्‍वरकर, पंचसदस्य सोनाली तेंडुलकर, सत्वशीला नाईक, प्रिया डोईफोडे, विठोबा गावडे, माजी सरपंच राजेश कवळेकर, मंडळाचे पदाधिकारी गणू नाईक, देवेंद्र ढवळीकर, मंडळाचे अध्यक्ष अनिल नायर, इतर पदाधिकारी व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती.

सरपंच मनुजा नाईक यांनीही शुभेच्छा व्यक्त करताना बाजारात माटोळीचे सामानही उपलब्ध करावे अशी सूचना केली. सूत्रसंचालन वेदांगी ढवळीकर यांनी तर वरुण तेंडुलकर यांनी आभार मानले.

दरम्‍यान, सर्व दुःखांचे हरण करणारा आणि मांगल्य पसरविणारा श्री गणराया ही बुद्धीची देवता. सर्वांना सुख, समृद्धी श्री गणेशाकडून मिळू दे अशी प्रार्थना करतानाच ढवळी- फोंडा येथील चतुर्थी बाजाराला मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी शुभेच्छा दिल्या.

Ganesh Chaturthi 2023
NIA चा गोव्यात छापा; फोंडा तालुक्यातील अल्पवयीन मुलाचा मोबाईल घेतला ताब्यात

कपडे, तोरणे, सजावटीचे साहित्‍य

जनतेला अनेक आपत्त्यांचा सामना करावा लागला. पण आता परिस्थिती बदलू लागली आहे. पुढील काळात प्रत्येकाच्या जीवनात सुख-समृद्धी येणार असून गणरायाचे आशीर्वाद सर्वांचा पाठीशी आहेत.

चतुर्थी बाजारात उपलब्ध करण्यात आलेल्या विविध वस्तूंमुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू रास्त भावात उपलब्ध होत असल्याने गणेश भक्तांसाठी त्‍या उपयुक्त ठरणार आहेत.

विशेष म्हणजे या चतुर्थी बाजारात माटोळीचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे सांगून सुदिन ढवळीकर यांनी सर्व भाविकांना त्यांनी चतुर्थीच्‍या शुभेच्छा दिल्या.

या बाजारात मिठाईसह सजावटीचे साहित्‍य, कपडे, तोरणे व अन्य वस्तू उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पंचवीसपेक्षा जास्ट स्टॉल्स असून ग्राहकांचाहचांगला प्रतिसाद मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com