

केपे: केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या वारीत सहभागी होत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पंचायत सदस्य संजय वेळीप, केपे युवक काँग्रेसचे अध्यक्ष देविदास तसेच अन्य वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार डिकॉस्टा यांनी मोले परिसरात वारकऱ्यांसोबत काही अंतर पायी चालत वारीत सहभाग नोंदविला. त्यानंतर त्यांनी वारकऱ्यांसमवेत सहभोजन करून त्यांच्या अडचणी व अनुभव जाणून घेतले.
तसेच सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देत श्री विठ्ठल-रखुमाईच्या चरणी समाजाच्या सुख-समृद्धी, ऐक्य, बंधुभाव आणि सलोख्यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, वारकरी समाजाच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल डिकॉस्टा यांचे आभार मानण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.