Quelossim Gram Sabh: "मनोरंजन प्रकल्पाला गावात थारा नकोच!" केळशी ग्रामसभेत स्थानिक ग्रामस्थांचा प्रशासनाविरोधात एल्गार

Quelossim Cuthali Tourism Project: केळशी-कुठ्ठाळीच्या खास ग्रामसभेत मोवाज एंटरप्रायझेसच्या पर्यटन प्रकल्पाला एकमुखी विरोध करण्यात आला.
Quelossim Cuthali Tourism Project
Quelossim Gram SabhDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: केळशी-कुठ्ठाळीच्या खास ग्रामसभेत मोवाज एंटरप्रायझेसच्या पर्यटन प्रकल्पाला एकमुखी विरोध करण्यात आला. या प्रकल्पाला तात्पुरता ना हरकत दाखला दिला आहे. त्याला कायदेशीर आव्हान देण्याचा तसेच गरज पडल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा ठराव घेण्यात आला. या सभेस उपस्थित असलेले कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनीही,

असले प्रकल्प आमच्या लहान गावात नकोच, असे स्पष्ट केले. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. केळशीच्या सरपंच स्वूसी डिसोझा यांनीही या प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले. केळशी येथे मोवाज एंटरप्रायझेसच्या तरंगत्या फलाटावर मनोरंजन सुविधा, उद्यान तसेच रिसॉर्ट प्रकल्पासाठी तत्कालीन कुठ्ठाळी पंचायतीने तात्पुरता ना हरकत दाखला २०१६ मध्ये दिला होता.

Quelossim Cuthali Tourism Project
Karapur Mega Project: मेगा प्रकल्पाच्या विरोधात कारापूरवासीय आक्रमक, जंतरमंतरवर सोमवारी आंदोलन

मात्र, हा दाखला २०१९ मध्ये पंचायतीने मागे घेतला. कंपनीने पुन्हा २०२१-२२ मध्ये ना हरकत दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पण नंतर विभाजित झालेल्या केळशी-कुठ्ठाळी पंचायतीने ना हरकत दाखला न दिल्याने कंपनीने यासंबंधी गटविकास कार्यालयात तक्रार केली होती. त्यासंबंधी निकाल देताना पंचायत संचालनालयाने संबंधित कंपनीला तात्पुरता ना हरकत दाखला देण्याचा निकाल गटविकास अधिकाऱ्यांना दिला.

गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीला तात्पुरता ना हरकत दाखला दिल्याने त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी सरपंच डिसोझा यांनी आज खास ग्रामसभेचे आयोजन चर्चच्या सभागृहात केले होते. आमच्या गावात पर्यटन प्रकल्प नकोच, अशी भूमिका घेऊन तसेच पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. याप्रसंगी ना हरकत दाखल्यावरही चर्चा करण्यात आली. या दाखल्याला आव्हान देण्याचा ठराव याप्रसंगी घेण्यात आला.

Quelossim Cuthali Tourism Project
Maina Curtorim Mega Project Protest: सरपंच, सचिवावर कारवाई करा! मायणा-कुडतरी मेगा गृहप्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

चर्चचे फादर मिंगेल परेरा यांनी केळशी पंचायतीने लोकांबरोबर राहावे, असे आवाहन केले. आम्हाला तो प्रकल्प गावात नकोच आहे. या प्रकल्पामुळे काही समस्या निर्माण होणार आहे. जेणेकरून गावकारपण व व्यवसाय संपणार असल्याचे ते म्हणाले. हा प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त ठरला आहे. झुआरी नदीकाठावर तरंगत्या फलाटावर मनोरंजन सुविधा, रिसॉर्ट व संबंधित पायाभूत सुविधांचा समावेश असलेल्या पर्यटन विकासाचा हा प्रस्ताव आहे.

गोव्याबाहेरील काही लोक या केळशीतील पर्यटन प्रकल्पाला परवानगी मिळावी, यासाठी येथील ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, या प्रकल्पाला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही.

- आंतोन वाझ, आमदार, कुठ्ठाळी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Dele Villagers Protest
Illegal Activities At Goa Tourist Places
Kelshi Floating Resort
Porvorim Town Square Project
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com