Arvind Kejriwal : ‘नोटीस रद्द’साठी केजरीवालांची धावाधाव

हस्तक्षेपास एकसदस्यीय खंडपीठाचा नकार, द्विसदस्यीय खंडपीठाकडे अर्ज
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Dainik Gomantak
Published on
Updated on

Arvind Kejriwal सार्वजनिक जागेत पोस्टर्स लावून, भिंती रंगवून मालमत्तांचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पेडणे पोलिसांनी 27 रोजी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

याला केजरीवालांनी आव्हान दिले असून या अर्जावरील सुनावणीवेळी नोटीस रद्द करण्याबाबत कायद्यातील तांत्रिक कारणांवरून त्यामध्ये एकसदस्यीय खंडपीठाने हस्तक्षेपास नकार दिला.

त्यामुळे द्विसदस्यीय खंडपीठाकडे हा अर्ज सादर करण्यासाठी केजरीवाल यांची धावाधाव सुरू झाली आहे.

पेडणे पोलिसांनी नोंद केलेल्या गुन्ह्यात आपले नाव नाही. त्यामुळे पोलिस ही नोटीस जारी करू शकत नाही, असा दावा केजरीवाल यांनी करून ही नोटीस रद्द करण्याची विनंती केली आहे.

मात्र, आज या अर्जात हस्तक्षेप करण्यात नकार देऊन द्विसदस्यीय खंडपीठाकडे सादर करण्यास सांगितले. 27 रोजी त्यांना चौकशीला बोलावण्यात आले आहे.

त्यापूर्वी त्याला अंतरिम स्थगिती मिळावी, यासाठी केजरीवाल यांच्या वकिलांनी नव्याने हा अर्ज द्विसदस्यीय खंडपीठासमोर उद्या बुधवारी तो यावा यासाठी धावाधाव सुरू झाली आहे.

Arvind Kejriwal
Canacona Bus Accident: खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य ठार

गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आम आदमी पक्ष तसेच तृणमूल काँग्रेसने प्रचारासाठी सार्वजनिक ठिकाणी प्रचाराचे पोस्टर्स लावून जागेचे विद्रुपीकरण केल्याची तक्रार करण्यात आली होती.

या प्रचाराच्या जाहिरातीच्या पोस्टर्स संदर्भातची माहिती पंचायत व पालिकांकडून सक्तवसुली संचालनालयाने काही महिन्यांपूर्वी गोळा केली होती.

Arvind Kejriwal
Manohar international Airport: ‘मोपा’वरून आणखी सात ठिकाणी उड्डाण

पेडणे पोलिसांच्या नोटिशीला आव्हान

पेडणे पोलिसांनी आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांना 20 रोजी तर अरविंद केजरीवाल यांना २७ एप्रिलला चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली होती. नोटीस न मिळाल्याने पालेकर गैरहजर राहिले.

पण केजरीवाल यांनी नोटीस मिळाल्याचे स्पष्ट करून पोलिसांसमोर चौकशीला जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, या चौकशीला जाण्यापूर्वीच त्यांनी खंडपीठात नोटिशीला आव्हान देणारा अर्ज सादर केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com