Manohar international Airport: ‘मोपा’वरून आणखी सात ठिकाणी उड्डाण

विस्तारा कंपनीने आपल्या सेवेत लखनौ शहर जोडले आहे.
Goa International Airport
Goa International Airport Gomantak Digital Team
Published on
Updated on

Manohar international Airport मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगो विमान कंपनीने आणखी 7 ठिकाणी आपली विमानसेवा सुरू केली आहे.

तर विस्तारा कंपनीने आपल्या सेवेत लखनौ शहर जोडले आहे. त्यामुळे येथून आता 21 ठिकाणी विमानसेवा सुरू झाल्याची माहिती ‘जीएमआर’ कंपनीने आज दिली आहे.

‘आयएटीए’ने आपले उन्हाळी हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले असून ते ऑक्टोबरच्या शेवटचा शनिवार 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत असेल.

Goa International Airport
Canacona Bus Accident: खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य ठार

नव्या वेळापत्रकानुसार इंडिगो कंपनीने अमृतसर, भुवनेश्वर, कोईमतुर, गुवाहाटी, रांची, राजकोट, विशाखापट्टनम आणि लखनौ या ठिकाणी आपली सेवा सुरू केली आहे. याशिवाय विस्तारा विमान कंपनीनेही लखनौ शहर जोडले आहे.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून यापूर्वीच दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, बंगळूर, मुंबई, कोलकाता, पुणे, नाशिक, जयपूर, चेन्नई, नागपूर, वाराणसी आणि चंदीगढ शहरे जोडलेली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com