Interview : मी स्वतंत्र मतांचा आमदार आहे ; केदार नाईक

गोमंतकला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये केदार नाईक यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.
Kedar Naik Interview
Kedar Naik Interview Dainik Gomantak
Published on
Updated on

2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. त्यापैकी साळगाव मतदारसंघाचे आमदार केदार नाईक यांनी निवडणुकीआधी भाजपमधून कॉंग्रेसमध्ये पक्षांतर केले आणि त्यांना मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी उभे असलेले केदार नाईक हे निवडूनही आले. यानिमित्ताने गोमंतक टीव्हीसाठी सल्लागार संपादक शैलेंद्र मेहता यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. (Kedar Naik Interview with Gomantak TV)

Kedar Naik Interview
मुख्यमंत्री प्रमोद सावंत उद्या मुंबई दौऱ्यावर

राजकीय पार्श्वभूमी

ते म्हणाले, मला राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. परंतु माझे आजी-आजोबा गोव्याच्या मुक्ती संग्रामात सामील होते. त्यामुळे लोकांसाठी काम करण्याची भावना माझ्यात रूजली. पुढे भागातील लोकांच्या मदतीसाठी मी पंचायत निवडणुकीसाठी उभा राहिलो आणि निवडूनही आलो. मी सरपंच म्हणून काम केले आहे. आणि इथूनच पुढे जाण्याची प्रेरणा मला मिळाली.

भाजप सोडण्याचा निर्णय

या आधी भारतीय जनता पक्षातूनच काम केलेले केदार नाईक यांनी निवडणुकीआधी पक्षाला राजीनामा देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र या आधीच्या पंचायत निवडणुका ते भाजपसोबतच लढले आहेत. तर या मागचे कारण विचारले असता ते म्हणाले की, 'मनोहर पर्रीकरांच्या विचारांमुळे मी भाजपात दाखल झालो होतो. मात्र आता ती विचारसरणी राहिली नसल्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. कारण आपण पहिले तर सध्या भाजपमध्ये निवडून आलेल्या आमदारांपैकी फक्त 4-5 आमदारच मूळ भाजपचे नेते आहेत, बाकी सगळे हे बाहेरचे किंवा पक्षांतर केलेलेच नेते आहेत.

Kedar Naik Interview
आता बहुमजली निवासी इमारतींनाही मिळणार मोफत पाणी!

साळगाव मतदारसंघातील समस्या आणि त्यासाठीचे प्रयत्न

निवडून आल्यापासून मी मतदारसंघातील समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली असून, त्या-त्या विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्यांचे निराकरण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहे. साळगावात प्रामुख्याने नोकरी, पाणी आणि वीज हे प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. मध्यंतरी आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात अनेक लोकांचे मला कॉल येत असतात आणि त्यासाठी मी काम करत आहे. त्याचबरोबर मतदारसंघात मान्सूनपूर्व कामे करायला देखील सुरुवात केली आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे लोकांचा फक्त सरकारी नोकरीकडेच कल दिसून येत आहे. पण माझे लोकांना सांगणे आहे की आपले गोवा राज्य पर्यटन राज्य असल्यामुळे आपल्याकडे सरकारी नोकरी व्यतिरिक्त नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. गरज आहे ती तरुणांना व्यवसाय मार्गदर्शनाची, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

मायकल लोबो यांच्याशी असलेले संबंध

केदार नाईक यांनी भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये जाण्याला कुठेतरी मायकल लोबोंचा संबंध असल्याचे बोलले जात आहे. याबद्दल नाईक म्हणाले, कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय मी स्वत: घेतला आहे. कारण मी स्वतंत्र मतांचा आमदार आहे. मायकल लोबो हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मदत केली आहे. चांगले सल्ले त्यांनी दिले आहेत. मात्र लोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन मी जनतेला करतो.

गोव्यासाठी व्हिजन

ते म्हणाले की, 'गोव्यात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी गोवा प्रशासनाने यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. आपले राज्य आत्मनिर्भर असणे गरजेचे आहे.

शब्दांकन : काव्या पोवार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com