कवळेकरांकडून गोमंतकीयांना नोकरीचे आश्वासन!

विरोधक नोकऱ्यांविषयी लोकांची दिशाभूल करीत असून याचे उत्तर लोकांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत दिले आहे असे कवळेकर यांनी सांगितले.
Kavlekar
KavlekarDainik Gomantak
Published on
Updated on

केपे : सरकारने जे दहा हजार नोकऱ्यांचे आश्वासन दिले आहे ते निवडणुकीपूर्वी पूर्ण करणार असल्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Deputy Chief Minister Chandrakant Kavlekar) यांनी सांगितले. शिरवई येथे घर घर चलो अभियानावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, नगरसेवक चेतन हळदणकर, प्रसाद फळदेसाई, गणपत मोडक, दयेश नाईक व अन्य कार्यकर्ते मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विरोधक नोकऱ्यांविषयी लोकांची दिशाभूल करीत असून याचे उत्तर लोकांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत दिले आहे असे कवळेकर (Kavlekar) यांनी सांगितले.

Kavlekar
गोव्यात 1 डिसेंबरपासून लसीकरण मोहीम फक्त आरोग्य केंद्रांवरच

जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्यात आल्या होत्या व या निवडणुकीत लोकांनी भाजपला साथ दिली होती नंतर पालिका निवडणुकीतही बारा पैकी दहा पालिकांवर भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले होते असे कवळेकर यांनी सांगितले. करोना काळात राज्य सरकारने लोकांना त्रास होऊ नये म्हणून बरीच कामे केली होती पण विरोधक मात्र गायब झाले होते व आता निवडणूका जवळ आल्याने लोकांमध्ये ससरकरविरोधात दूषप्रचार करीत आहे असे त्यांनी सांगितले. राज्यातील जनतेने भाजपा सरकारच्या कार्यकाळात चालू असलेली विकास कामे पहिली असून परत एकदा लोक भाजपाला साथ देऊन परत एकदा सत्तेवर आणणार असल्याचे कवळेकर यांनी सांगितले.

केपेचे आमदार बाबू कवळेकर यांनी भाजपात प्रवेश केल्याने खऱ्या अर्थाने केपेचा विकास झपाट्याने होत असल्याचे शिरवईकर यांनी सांगितले. करोना महामारीवेळी लोकांना त्रास होऊ नये म्हणून कवळेकर यांनी करोना बाधित रुग्णासाठी केपेतच कोविड सेन्टर उभारून सेवा मिळवून दिली होती पण विरोधकांनी काहीच केले नव्हते असे शिरवईकर यांनी सांगितले.

Kavlekar
इंडियन रेड क्रॉस सोसायटी मुरगाव शाखेने विविध शाळांना वाटले मास्क

चार वेळा केपेतील जनतेने कवळेकर यांना निवडून दिले असून यावेळीही लोक भरघोस मतांनी कवळेकर यांना निवडून आणणार यात कोणतीही शंका नाही असे प्रसाद फळदेसाई यांनी सांगितले. आमदार कवळेकर यांनी भाजपात प्रवेश करताच उपमुख्यमंत्री पद देऊन सरकारने एक प्रकारे केपेच्या लोकांचा सन्मान केला प्रत्येक निवडणुकीत लोकांनी कवळेकर यांना सहकार्य केले आहे ते यावेळीही तसेच राहणार असून कवळेकर हे किमान पाच हजार मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com