Goa Loksabha Election: इंडिया आघाडी आरजीच्या तीन अटी मान्य करणार? परब, परेरा यांचे अर्ज दाखल

Goa Loksabha Election: मंगळवारी भाजपच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर या दोन दिवसांत काँग्रेस आणि आरजीच्या उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले आहेत.
RG's Manoj Parab Files Nomination
RG's Manoj Parab Files NominationDainik Gomantak

Goa Loksabha Election

गोव्यात प्रमुख लढत होणाऱ्या भाजप, काँग्रेस (इंडि आघाडी) आणि रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाच्या लोकसभा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

मंगळवारी भाजपच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर या दोन दिवसांत काँग्रेस आणि आरजीच्या उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले आहेत, याशिवाय काही अपक्ष उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले आहेत.

आरजीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाच्या वतीने पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी स्नेहा गिते यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपुर्द केला. तसेच, दक्षिणेत रुबर्ट परेरा यांनी देखील जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अद्याप दोन दिवसांचा कालावधी उरलेला असून, आरजीने इंडिया आघाडीसमोर ठेवलेल्या तीन अटी मान्य करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. आरजीने आघाडीसोबत जागा वाटपावर चर्चेसाठी तयारी दर्शवली असून, त्यांच्यासमोह तीन अटी ठेवल्या आहेत.

RG's Manoj Parab Files Nomination
Goa BJP Anthem: ह्या वेळार 400 पार, परतुन एकदा मोदी सरकार! गोवा भाजपचं लोकसभेसाठी गाणं प्रदर्शित Watch
RG's Rubert Pereira
Files Nomination
RG's Rubert Pereira Files NominationDainik Gomantak

यामध्ये म्हदई नदीचे संरक्षण, कोमुनिदाद जागेवरील बेकायदा कामे हटवणे आणि पोगो बिल स्विकारण्यास आघाडी तयार असल्यास त्यांनी चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

तीन अटी मान्य करण्यासाठी आरजीने आघाडीला २० एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. विशेष म्हणजे याचदिवशी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख देखील आहे.

त्यामुळे उरलेल्या दोन दिवसांत आघाडी आरजीच्या अटी मान्य करणार का? आणि जागावाटपाबाबत आरजीसोबत चर्चा होणार का हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com