Candolim Bungalow Robbery: रक्षणकर्तेच ठरले भक्षक! कांदोळीत 6 सुरक्षा रक्षकांनीच केला विश्वासघात; कोट्यवधींच्या चांदी अन् रत्नजडित दागिन्यांवर मारला हात, गुन्हा दाखल

Goa Security Guards Theft Case: गुरुग्राम (हरियाणा) येथील रहिवासी रोहिना मेहरा यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Goa Security Guards Theft Case
Candolim Bungalow RobberyDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: कांदोळी येथील ‘काश्मीर हाऊस’ या बंगल्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका नामांकित सुरक्षा कंपनीच्या सहा सुरक्षा रक्षकांनी संगनमत करून मौल्‍यवान वस्तूंचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

गुरुग्राम (हरियाणा) येथील रहिवासी रोहिना मेहरा यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, १७ मार्च २०२६ ते १९ मे २०२६ या कालावधीत ‘काश्मीर हाऊस’च्या सुरक्षेची जबाबदारी तसेच बंगल्याच्या चाव्या अर्घ्य दलाई, संदीप प्रधान, अतनू जाना, राजेंद्र मैती, रिंटू नायक, अपूर्व दास या सहा सुरक्षा रक्षकांकडे होत्या.

Goa Security Guards Theft Case
Colvale Central Jail Security: कोलवाळ कारागृहात सध्या चाललेय काय? सुरक्षेचा फज्जा, गुन्हेगारी नेटवर्क जोमाने कार्यरत

मात्र, त्यांनी मालकाचा विश्वासघात करून संगनमताने बंगल्यातील मौल्‍यवान वस्तूंचा अपहार केल्याचा आरोप आहे. संशयितांनी बंगल्यातून चांदीच्या तब्बल ९६२ वस्तू पळवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यामध्ये कटोरे, कॉफी पॉट, वाईन कप, फोटो फ्रेम, कंदील, ट्रे, हुक्का, नृत्यांगनेची मूर्ती, इत्तराच्या बाटल्या, पॉट, फ्लॉवर वॉस, शंख, उंटाची मूर्ती, जाळी बॉक्स आणि लोटा यांचा समावेश आहे. याशिवाय मौल्यवान खड्यांचे पेंडंट, कानातले, हार, ब्रेसलेट, बांगड्या, अंगठ्या, ब्रोच, पैंजण, चेन आणि कफलिंक्स आदी मिळून तब्बल ६८२ प्रकारचे सोन्या-चांदीचे व रत्नजडित दागिनेही अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com