'जल योजना' फक्त कागदावर, 49 कुटुंबांना विहिरींचा आधार

Karvy-Pirla: ग्रामस्थांनी थेट पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून पाणीपुरवठा करण्याची मागणी केली
Har Ghar Nal Se Jal
Har Ghar Nal Se Jal Dainik Gomantak
Published on
Updated on

Karvy-Pirla: कावरे-पिर्ला येथील गावकरवाडा येथील 49 कुटुंबीयांच्या घरी ‘हर घर नल से जल’ या योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या नळांना अद्याप पाणीपुरवठा केला नसल्याने ग्रामस्थांनी थेट पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

गावकरवाडा येथील ग्रामस्थांशी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातर्फे 2021 मध्ये बैठक घेऊन लोकांना ‘हर घर नल से जल’ या योजनेखाली प्रत्येकांनी आपल्या घरात नळ बसवण्यासंदर्भात माहिती दिली होती. त्यानुसार लोकांनी आपापल्या घरात नळ जोडणी केली. पण हे काम सुरू असताना 2022 च्या सुरुवातीलाच विधानसभा निवडणुका आल्याने संबंधित खात्याला लोकांना पाणीपुरवठा करता आला नाही.

Har Ghar Nal Se Jal
Goa: पारदर्शक कारभारासाठी आता डिजिटल पद्धत अत्यावश्‍यक!

त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा राज्य ‘हर घर नल से जल’ ही योजना लोकांपर्यंत पोचवणारे पाहिले राज्य असल्याचे घोषित केल्याने गावकरवाडा येथील लोक आचंबीत होऊन पंतप्रधान कार्यालयाला व संबंधित खात्याला पत्राद्वारे सूचित केल्याचे प्रणय कावरेकर यांनी सांगितले.

सध्या गावकरवाडा येथील लोक गावात असलेल्या दोन विहिरीच्या पाण्यावर आपली तहान भागवतात, असे कावरेकर यांनी सांगितले. याविषयी केपे येथील पाणी विभागाचे सहायक अभियंता करमळकर यांनी गावात जाऊन पाहणी करून येत्या काही दिवसात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे लोकांना सांगितले असल्याचे कावरेकर यांनी सांगितले.

Har Ghar Nal Se Jal
Goa Sopo: सोपो वाढविण्यास विक्रेत्यांचा विरोध

याविषयी अभियंता करमळकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले, आम्ही पंचायत मंडळाकडे ज्या लोकांना या योजनेअंतर्गत जोडणी पाहिजे, त्यांची नावे द्यावी, त्याप्रमाणे गावकरवाडा येथील 49 लोकांनी नावे दिली होती. त्यानुसार आम्ही आमचे सर्व सोपस्कार पूर्ण करून मीटर बॉक्ससुद्धा बसवण्याचे काम पूर्ण केले आहे.

पण त्यांनी अद्याप कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सदर दस्तऐवज खात्याकडे दाखल केले नसल्याने पाणीपुरवठा अद्याप केला नसल्याचे त्यांनी सांगितले. 28 रोजी गावकरवाडा येथे प्रत्येक घरांना भेट देऊन सदर सोपस्कार पूर्ण करावे, अशी लोकांना विनंती केली असल्याचे अभियंता करमळकर यांनी सांगितले. सदर कायदेशीर सोपस्कार पूर्ण होताच, लोकांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com