Tristate Meet: गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक पहिल्यांदाच समन्वय बैठक का घेतायेत? कोणत्या विषयावर होणार चर्चा

Karnataka, Maharashtra and Goa: या बैठकीसाठी तिन्ही राज्यातील 25 अधिकारी सहभागी होणार आहेत.
Forest Area Invasion
Forest Area InvasionDainik Gomantak
Published on
Updated on

Karnataka, Maharashtra and Goa Meeting

गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये म्हादईच्या मुद्यावरुन वाद सुरु असताना आता ही तीन राज्य एका महत्वाच्या मुद्यावर एकत्र बैठक घेत आहेत.

महत्वाची बाब म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची समन्वय बैठक होत असून, या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज (15 मे, सोमवार) कर्नाटकातील दांडेली येथे ही बैठक होणार आहे.

तीन राज्यांच्या समन्वय बैठकीत वन्य संबधित विषयावर समन्वय आणि विविध विषयावर तोडगा काढण्याबाबत चर्चा होणार आहे. बैठकीसाठी तिन्ही राज्यातील उच्च पदस्थ अधिकारी हजेरी लावतील. यात व्याघ्र प्रकल्पाबाबत देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीसाठी तिन्ही राज्यातील 25 अधिकारी सहभागी होणार आहेत. या वनअधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशा पद्धतीची चर्चा कर्नाटक, तमिनळनाडू आणि केरळ राज्यात झाली. यात मनुष्य-प्राणी वादावर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने रानटी हत्तीमुळे होणारे नुकसान आणि त्याबाबची काळजी याबाबत चर्चा झाली.

Forest Area Invasion
ED Goa: गोव्यातील विपुल शिपयार्ड कंपनीवर ईडीचा छापा, 12.20 कोटींची मालमत्ता जप्त

कोणत्या चार मुख्य मुद्यांवर होणार चर्चा?

- माहितीची देवाणघेवाण सुधारण्यासाठी योजना विकसित करण्यासाठी सहकार्य करणे

- वणवा व्यवस्थापन आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण

- आंतरराज्य किनारी आणि सागरी परिसंस्था संरक्षणासाठी सहकार्याच्या संधी ओळखून अंमलबजावणी करणे

- तपासणी नाका व्यवस्थापन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com