Goa Liquor Ban: मोठी बातमी! गोव्यातील कर्नाटकलगतच्या गावांमध्ये दारू विक्रीवर 'या' तारखेपर्यंत बंदी

सत्तरी, काणकोण, धारबांदोडा तालुक्यातील गावांमध्ये अंमलबजावणी
Goa Liquor Ban
Goa Liquor BanDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Liquor Ban: कर्नाटक सीमेपासून गोव्याकडील 5 किलोमीटर आत भागात दारू विक्रीबाबत नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे निर्देश राज्याच्या अर्थ विभागातील महसूल आणि नियंत्रण विभागाचे सचिव प्रणब भट्ट यांनी जारी केले आहेत. त्यानुसार राज्याच्या काही भागामध्ये आता सायंकाळी 6 नंतर मद्य विक्री करता येणार नाही.

Goa Liquor Ban
Goa Heritage House: पर्यटकांसाठी खुषखबर! आता गोव्यातील हेरिटेज हाऊसमध्ये राहता येणार...

कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान होत आहे. कर्नाटकातील प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्या पार्श्वभुमीवर कर्नाटककडे होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्या पार्श्वभुमीवर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारने सर्व परवानाधारक मद्यविक्रेत्यांना 8 मे पासून सायंकाळी 6नंतर दारू विक्रीवर बंदी घातली आहे. हा निर्णय 10 मेच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असणार आहे. कर्नाटकमध्ये 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे त्या दिवशीच्या मध्यरात्रीपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे.

काणकोण तालुक्यातील पोलेम, धारबांदोडातील मोले, आणि सत्तरीतील सुर्ला येथे हा निर्णय लागू केला गेला आहे. ही गावे कर्नाटकच्या सीमेपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहेत.

Goa Liquor Ban
Vijai Sardesai: 'म्हादई'बाबतचे मौन हा गोव्यातील भाजप नेत्यांच्या दुटप्पी वृत्तीचा पुरावा

या परिसरातील परवानाधारक बार आणि रेस्टॉरंटनी बाहेरच्या बाजूला मद्य मिळणार नाही, केवळ जेवण मिळेल, अशा स्वरूपाचे फलक लावावेत, असेही निर्देशांमध्ये म्हटले आहे. या निदेर्शांचे पालन न झाल्यास संबंधित आस्थापनांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

निवडणुकीत मतदारांना लुभावण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर केला जातो. हा गैरवापर टाळला जावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com